वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

परसोडा येथे प्रवासी निवारा उभारा:शुभम आमने यांची आमदार करण देवतळे यांच्याकडे मागणी

परसोडा येथे प्रवासी निवारा उभारा:
शुभम आमने यांची आमदार करण देवतळे यांच्याकडे मागणी

वरोरा तालुक्यातील परसोडा येथे बसथांबा असून देखील प्रवाशांना बसण्यासाठी कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधा उपलब्ध नाहीत. खैरगाव आणि परसोडा या दोन गावांचा एकच बसथांबा असल्याने दररोज मोठ्या प्रमाणावर प्रवासी या ठिकाणी थांबतात.

वरोरा–चिमूर महामार्गाचे काम सुरू होताना या ठिकाणी असलेला जुना प्रवासी निवारा पाडण्यात आला, मात्र काम पूर्ण होऊनही तो अद्याप पुन्हा उभारण्यात आलेला नाही. त्यामुळे दोन्ही गावांतील नागरिक, विद्यार्थी व प्रवासी यांना उन्हात, पावसात रस्त्याच्या कडेला उभं राहून बसची वाट पाहावी लागते.
या गंभीर समस्येची दखल घेत परसोडा येथील युवा सामाजिक कार्यकर्ते शुभम शिवशंकर आमने यांनी वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार करण देवतळे यांना निवेदन देत प्रवासी निवारा बांधण्याची विंनती केली आहे.

निवेदनाद्वारे शुभम आमने यांनी विद्यार्थी, वृद्ध व इतर प्रवाशांची होणारी गैरसोय लक्षात घेता प्रशासनाने तातडीने या ठिकाणी प्रवाशांसाठी निवाऱ्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी विनंती केली आहे.

Comments