वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

रंगीबेरंगी आकाश दिव्यांनी सजले आनंद निकेतन महाविद्यालय

रंगीबेरंगी आकाशदिव्यांची सजावट, विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव

वरोरा, (तारीख): आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा येथे शैक्षणिक अभ्यासक्रमाबरोबरच विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी नेहमीच विविध कार्यक्रम आणि स्पर्धांचे आयोजन केले जाते. यावेळी दीपावली सणाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसाठी कागदी आकाशकंदील तयार करण्याच्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या उपक्रमात सहभागी झालेल्या १५० विद्यार्थ्यांनी आपल्या कल्पकतेने रंगीबेरंगी आणि सुंदर आकाशदिवे तयार केले. विद्यार्थ्यांनी विविध रंग, आकार आणि साहित्य वापरून कलात्मक आकाशदिवे बनवून आणले. विद्यार्थ्यांना हे आकाशदिवे तयार करण्यासाठी सांस्कृतिक विभागाच्या डॉ. दीप्ती चिटणीस आणि प्रा. किरण लांजेवार यांनी विशेष मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमास प्राचार्य डॉ. मृणाल काळे आणि उपप्राचार्य प्रा. राधा सवाने यांचे मार्गदर्शन लाभले. सर्व शिक्षक, शिक्षिका व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी मोलाचे सहकार्य केले.

Comments