वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमात मार्गदर्शन कार्यक्रम*

*जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रमात मार्गदर्शन कार्यक्रम*

चंद्रपूर, दि. 01 : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त डेबुजी सावली वृद्धाश्रम, देवाडा येथे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात ज्येष्ठ नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्या, समुपदेशन तसेच सामाजिक न्याय विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या तीर्थदर्शन योजना, वयोश्री योजना यांसारख्या योजनांची माहिती देण्यात आली. तसेच ‘ज्येष्ठ नागरिकांचे हक्क व अधिकार (2005 चा कायदा)’ या विषयावर सहाय्यक आयुक्त समाज कल्याण विनोद मोहतुरे यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
समुपदेशक अतुल शेंद्रे यांनी वृद्धांच्या सामाजिक, मानसिक व आरोग्य विषयक अडचणींवर उपाययोजना आणि ताण-तणाव कमी करण्याच्या उपायांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या सुरुवातीस सर्व ज्येष्ठ नागरिकांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी डी.आर. धात्रक, ज्योती शेंडे, पूनम आसेगावकर, श्वेता लखावार, वैशाली ठाकरे, सचिन राउत, संदीप रामटेके, सुजल कांबळे, संदीप वाढई, राहुल आकुलवार, गणेश खोटे, विनोद सोनुले, चेतना खाडीलकर आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन धनंजय तावडे यांनी तर आभार प्रकल्प अधिकारी सचिन फुलझेले यांनी मानले. शेवटी सर्व वृद्धांना फळे, मिठाई व आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.

०००००००

Comments