वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

आनंदवन येथे श्रद्धेय बाबा आमटे समाधी दर्शनाने रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात

आनंदवन येथे श्रद्धेय बाबा आमटे समाधी दर्शनाने रवींद्र शिंदे यांच्या सामाजिक उपक्रमांची सुरुवात

वरोरा (प्रतिनिधी):
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक मर्या., चंद्रपूरचे अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे यांनी आपल्या जन्मदिवसानिमित्त समाजसेवेचा संकल्प करत आनंदवन येथे श्रद्धेय बाबा आमटे आणि साधनाताई आमटे यांच्या समाधीचे दर्शन घेऊन सामाजिक उपक्रमांना सुरुवात केली.
या प्रसंगी शिंदे यांच्यासोबत प्रा. धनराजजी आस्वले व मित्रपरिवार उपस्थित होते. त्यांनी थोर समाजसेवक आदरणीय बाबा आमटे यांच्या समाधीला वंदन केले तसेच डा. विकासजी आमटे व डा. भारती आमटे यांची भेट घेऊन आशीर्वाद प्राप्त केले. यावेळी सौ. पल्लवी आमटे देखील उपस्थित होत्या.
त्यानंतर आनंदवन येथील 200 हून अधिक कुष्ठरोगी रुग्णांना फळांचे वाटप करण्यात आले. या वेळी डा. पोळ, सुधाकर कडू, जयंत टेंभुर्डे, राजेश ताजने, धनराज अस्वले (काका), डॉ. वजे, राजीव मिश्रा, खेमराजजी कुरेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

📍 आनंदवन ग्रामपंचायत भेट
आनंदवन ग्रामपंचायतीच्या वतीने अध्यक्ष मा. रवींद्र शिंदे यांचा सत्कार करण्यात आला. त्यांनी ग्रामपंचायतीच्या सर्व सदस्यांचे मनःपूर्वक आभार मानले आणि समाजसेवेच्या कार्यात सतत सहभागी राहण्याचा निर्धार व्यक्त केला.
📍 वरोरा उपजिल्हा रुग्णालयात फळवाटप
यानंतर वरोरा येथील उपजिल्हा रुग्णालयात भारतीय जनता पार्टी व ट्रस्टच्या वतीने फळवाटप करण्यात आले. या प्रसंगी विधानसभा प्रमुख डॉ. रमेश राजुरकर, ट्रस्टचे कार्यवाहक, भाजपा वरोरा शहराध्यक्ष संतोष पवार, बँकेचे संचालक जयंत टेंभुर्डे, तसेच बाजार समिती संचालक बाळूभाऊ भोयर आदी मान्यवर उपस्थित होते.

या सर्व उपक्रमांतून मा. रवींद्र शिंदे यांनी समाजातील दुर्बल घटकांप्रती असलेली बांधिलकी व सेवाभाव अधोरेखित केला.

Comments