वरोरा
चेतन लूतडे
वरोरा शहरातील महावीर भवन, डोंगरवार चौक येथे कल्पतरू गणेश मंडळातर्फे मोफत हृदय तपासणी शिबिराचे दि. २ सप्टेंबर रोजी शिबिर संपन्न झाले. मंडळाचे अध्यक्ष चेतन विजय शर्मा यांच्या हस्ते या शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी सर्व सदस्य व नागपूर येथील रिथम हार्ट अँड क्रिटिकल केअरचे डॉ. मनीष जुनेजा, डॉ. हर्षवर्धन रामटेके, डॉ. रोशन मेनन यांच्या मार्गदर्शनाखाली तपासणी रुग्णांची तपासणी करण्यात आली.
तपासणी व उपचार सुविधा
या शिबिरात हृदयरोग, डायबेटीस, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, एचडी एल, ईसीजी, आरबीएस, बायपास सर्जरी संबंधी सल्ला आणि इतर विविध तपासण्या करून रुग्णांना सल्ला देण्यात आला. उपस्थित डॉक्टरांनी प्रत्येकाची वैयक्तिक तपासणी करून आवश्यक उपचाराबाबत मार्गदर्शन केले.
शिबिरातील सहभाग व निदान
या उपक्रमात सुमारे शेकडो रुग्णांनी सहभाग घेतला. तपासणीदरम्यान बहुतांश रुग्णांमध्ये कोलेस्ट्रॉल आणि एचडीएल वाढल्याचे निदर्शनास आले. डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली या रुग्णांना औषधे लिहून देण्यात आले. आरोग्य-सल्ला, आहार व जीवनशैलीत बदलाचे महत्त्व पटवून देण्यात आले.
सामाजिक आरोग्यजागृतीस हातभार
कल्पतरू गणेश मंडळाच्या पुढाकाराने व विशिष्ट डॉक्टरांच्या उपस्थितीत आयोजित हा उपक्रम समाजात हृदयविकारासंबंधित आरोग्याविषयी जनजागृती व आरोग्यसंवर्धनास महत्त्वाचा ठरला आहे. यावेळी सीपीआर कशा पद्धतीने दिला जातो याचे प्रात्यक्षिक देण्यात आले.
कल्पतरू गणेश मंडळ अध्यक्ष चेतन विजय शर्मा
अशाच पद्धतीचे आरोग्य विषयी कॅम्प गणपती मंडळांनी आयोजित करावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होईल.
अशाच पद्धतीचे आरोग्य विषयी कॅम्प गणपती मंडळांनी आयोजित करावे जेणेकरून सर्वसामान्य नागरिकांना याचा लाभ होईल.
*********************************
Comments
Post a Comment