माजी मंत्री बच्चू कडू यांची श्री प्रकाश मुथा यांच्या कार्यालयात सदिच्छा भेट.शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर विचार विनिमय. शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असलेल्या माढेळी सभेत वेळेअभावी उपस्थित राहू शकले नव्हते.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सविस्तर विचार विनिमय.
शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी असलेल्या माढेळी सभेत वेळेअभावी उपस्थित राहू शकले नव्हते.
वरोरा
चेतन लूतडे
माढेळी: शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी, सातबारा कोरा रद्द करण्यासाठी, दिव्यांगांसाठी मानधन, चंद्रपूर जिल्हा दुष्काळग्रस्त जाहीर करण्यासाठी तसेच शेतमालाला योग्य भाव मिळावा या मागणींसाठी माढेळी येथे एक सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी यवतमाळ जिल्ह्यातील दिंदोडा, मार्डी, गाडेगाव तर वर्धा जिल्ह्यातील शेकापूर, धानोरा तसेच माढळी व नागरी परिसरातील सुमारे पाच ते सहा हजार शेतकरी या सभेसाठी एकत्र आले होते. सभेत माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांची गर्जणारी भाषणाची शेतकऱ्यांना अपेक्षा होती. तालुका आयोजक अमोल काटकर यांच्या वतीने आयोजित या सभेसाठी बच्चुभाऊ कडू वेळेच्या अभावामुळे हजर राहू शकले नाहीत.
मात्र, नंतर नागपूरला जाण्यापूर्वी माजी मंत्री बच्चुभाऊ कडू यांनी माढेळी येथे सहकार क्षेत्रातील गुरुवर्य श्री प्रकाश मूथा यांच्या कार्यालयात भेट देऊन आपली दिलगिरी व्यक्त केली. या भेटीदरम्यान शेतकऱ्यांच्या हमीभाव, आयात-निर्यात धोरण, कर्जमाफी, सरकारचे तत्कालीन धोरण, कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या, चंद्रपूर जिल्ह्याला ओल्या दुष्काळातून वगळण्यात आले. अशा बऱ्याच विषयांवर श्री प्रकाश मुथा यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली. यावेळी प्रकाश मुथा आणि प्रतीक मुथा यांच्या तर्फे छोटेखानी सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या धोरणावर या चर्चा झाल्या. या छोटेखानी कार्यक्रमानंतर बच्चुभाऊ कडू नागपूरला रवाना झाले.
या भेटीमुळे माढेळी परिसरातील शेतकऱ्यांची नाराज कमी झाली असून. बच्चू कडू यांचे नेतृत्वात शेतकऱ्यांनी उभारलेल्या लढ्यामध्ये माढळी परिसरातील शेतकरी सहभाग दर्शवतील अशी आशा व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment