भद्रावतीत कृषी उत्पन्न बाजार समितीवरून राजकीय वाद गहरावला; शिंदे आणि डुकरे यांच्यात तीव्र तणावमला जीवे मारण्याची धमकी, रवींद्र शिंदे अध्यक्ष सीडीसीसी
मला जीवे मारण्याची धमकी, रवींद्र शिंदे अध्यक्ष सीडीसीसी
प्रतिनिधी 4/9/2025
भद्रावती : भद्रावती शहरात कृषी उत्पन्न बाजार समितीवरून निर्माण झालेल्या राजकीय वादानंतर येथील राजकीय वातावरण तापले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे यांनी 'लाईव्ह चंद्रपूर' कडे दिलेल्या मुलाखतीत आरोप केले आहे की, त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात असून, त्यांची प्रतिमा डागाळण्यासाठी खोटे आरोप घातले जात आहेत.
या प्रकरणाची सुरुवात डुकरे यांनी शिंदे यांच्याविरुद्ध पोलीस स्टेशन भद्रावती येथे तक्रार नोंदवल्यानंतर झाली. यानंतर शिंदे यांनी माध्यमांतर्फे आपली बाजू मांडताना सांगितले, "मला जीवे मारण्याची धमकी येत असल्याने माझ्याबद्दल कुरखोडी करण्यासाठी विरोधी पक्षाजवळ काहीच उरले नाही. म्हणूनच असे खोटे आरोप माझ्यावर केले जात आहेत."
भद्रावतीमधील कृषी उत्पन्न बाजार समितीवर शिंदे यांचेच वर्चस्व असल्याचे मानले जाते. मात्र, शिंदे यांच्या भाजप प्रवेशामुळे बरेच शिवसैनिक कार्यकर्तेही त्यांच्यासोबत भाजपमध्ये गेले. यामुळे बाजार समितीची सत्ता उलटली आहे. या पार्श्वभूमीवर उभाटा शिवसेना गटाचे डुकरे यांना नाराजी व्यक्त करताना दिसून येत आहे.
शिंदे यांच्याविरुद्ध डुकरे यांनी नोंदवलेल्या तक्रारी नंतर शिंदे यांनी पलटवार केला आहे. शिंदे कायद्याच्या चाकोरीत राहून कार्य करत आहेत. त्यामुळे होणारे अपप्रचार थांबावे येणाऱ्या काळात सत्य समोर येईल. असेही ते म्हणाले.
अशाप्रकारे दोन्ही गटांमधील तणाव वाढताना दिसत आहे आणि भद्रावतीत राजकीय वातावरण अत्यंत तणावग्रस्त बनले आहे.
Comments
Post a Comment