ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पात "जिप्सी प्रवेश बंद"
वरोरा
चेतन लूतडे
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या शुल्कात अन्यायकारी वाढ करुन शासनाने सामान्य माणसांसाठी जागतिक ख्यातीच्या व्याघ्र प्रकल्पाचे दर्शन स्वप्न ठरवुन स्थानिकांवर अन्याय करत आहे. याबाबत क्षेत्रसंचालक कार्यालय, मूल रोड, चंद्रपूर येथे झालेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत शुल्क वाढी संदर्भात चर्चा झाली. या बैठकीला क्षेत्र संचालक डॉ. प्रभुनाथ शुक्ल आणि संबंधित अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
मात्र, ह्या बैठकीतुन मुख्य मागणींवर काहीही तोडगा निघाला नाही. शासनाला सामान्य लोकांसाठी काम करायचे नाही हे परत अधोरेखित झाले असून, आपली लोकप्रतिनिधी म्हणून माझा शब्द आहे की "ही" अन्यायकारक दरवाढ मागे घेतल्याशिवाय मी शांत बसणार नाही.
ह्या शुल्कवाढीच्या विरोधात मी उद्यापासून "जिप्सी प्रवेश बंद" आंदोलनाची हाक दिली आहे. उद्या ताडोबात एकही जिप्सी जाणार नाही. आपल्या हक्कांसाठी सर्वांनी या आंदोलनात सहभागी व्हावे, ही विनंती
************
Comments
Post a Comment