वरोरा
तालुक्यातील रानतळोधी( नवीन) येथे ओज बहुउद्देशीय संस्था वरोरा,वेद संस्था वरोरा व हेल्पेज इंडिया,वरलक्ष्मी फॉउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
या शिबिराचे उद्घाटन वेध संस्थेचे कार्यकर्ता विलास माटे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून नं. रानतळोधी गावच्या सरपंच काजोल मडावी, उपसरपंच कैलास कुमरे व ग्रा. सदस्य श्री. मंगलदास आत्राम ओज संस्थेचे सचिव आशिष रॊकडे, हेल्पेज इंडिया संयोजिका राशेदा शेख , डॉ. शेख इत्यादी उपस्थित होते.
हेल्पेज इंडिया व वरलक्ष्मी फाउंडेशन वरोरा द्वारा गावातील 58 लोकांची आरोग्य तपासणी करून उपचार करण्यात आले. रानतळोधी गाव हे 98 टक्के आदिवासी असून या गावाला आरोग्य सेवा मिळत नाही. गावाचे पुनर्वसन झाले असून शासकीय सुविधा पासून गाव वंचित आहे. बी.पी.,शुगर,सर्दी,ताप,खोकला इत्यादी आजारावर उपचार करण्यात आले. याकरिता डॉक्टर शेख व राशीदा शेख व त्यांच्या टीमने मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सरपंच,सदस्य व गावातील बचत युवक महीला गटांनी सहकार्य केले आहे. असे रमेश चौधरी यांनी कळविले.
Comments
Post a Comment