जनता पतसंस्थेची ५३वी वार्षिक सभा संपन्न; सहकाराचे महत्त्व राष्ट्रघडणीत महत्त्वाचे पाऊल आहे.


जनता पतसंस्थेची ५३वी वार्षिक सभा संपन्न; सहकाराचे महत्त्व राष्ट्रघडणीत महत्त्वाचे पाऊल आहे.

चंद्रपूर 
चेतन लूतडे 

चंद्रपूर : जनता शासकीय निमशासकीय सेवकांची सहकारी पतसंस्था मर्यादा, चंद्रपूर यांची ५३वी वार्षिक आमसभा, सत्कार समारंभ तथा गुणवंत गौरव समारंभ यांचे आयोजन रविवार, दिनांक २८ रोजी जनता महाविद्यालय, चंद्रपूर येथे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे मुख्य अतिथी चांदा शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. अशोक जीवतोडे तर विशेष अतिथी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रविंद्र शिंदे होते. यावेळी त्यांनी सहकार क्षेत्राचे समाजावरील होणारे सकारात्मक परिणाम तसेच त्याचे राष्ट्रघडणीतील महत्त्व यावर भर दिला.

कार्यक्रमास संचालक सौ. नंदाताई अल्लुरवार, श्री. रोहित बोम्मावार, जनता पतसंस्थेचे अध्यक्ष रविंद्र देवाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील विविध महाविद्यालयीन प्राचार्य, मान्यवर गणमान्य व्यक्ती तथा संस्थेचे सदस्य उपस्थित होते. या दरम्यान संस्थेकडून विविध क्षेत्रातील गुणवंत सदस्यांचा तसेच कर्मचाऱ्यांचा गौरव करण्यात आला.

Comments