*वरोरा येथे भव्य गणपती विसर्जन; विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिरच्या मानाच्या गणपतीची गांधीसागर तलावावर विसर्जन.
*वरोरा येथे भव्य गणपती विसर्जन; विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिरच्या मानाच्या गणपतीची गांधीसागर तलावावर विसर्जन.
वरोरा गणपती विसर्जनाला सुरुवात.
चेतन लूतडे
वरोरा: वरोरा शहरामध्ये गणपती विसर्जनास सुरुवात झाली असून यावर्षीही भक्तिभावाने आणि उत्साहातून बाप्पांना निरोप दिला जात आहे. शहरातील मानाचा गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिर व हनुमान मंदिर गणपतीचे विसर्जन गांधीसागर तलावात करण्यात आले.
या विसर्जनसमारंभाला शहरातील मान्यवर व्यक्ती, सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते उपस्थित होते. मंडळाच्या सर्व सदस्यांनी आणि भाविक भक्तांनी गणपती बाप्पाची भक्तिभावाने पूजा-अर्चना केली आणि आनंदातून तसेच थोड्याशा निराशेने बाप्पाला निरोप दिला. विसर्जनाची मिरवणूक भव्य आणि दिव्य स्वरूपात पाहायला मिळाली. भाविक ढोल, ताशाच्या गजरात नाचत-गातत बाप्पाला विसर्जनासाठी नेत होते.
गणपतीची आरती मोठ्या हर्ष उल्हसात म्हणत गणेशाला शेवटचा निरोप देत. "गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या". चा घोषणामध्ये परिसर दुमदुमून गेला .
या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान पोलीस प्रशासनाने चोख व्यवस्था केली होती. शिवाय, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील विविध पक्षांनी आपापले पेंडॉल उभारून गणेश मंडळाच्या अध्यक्षांचे तसेच यात सहभागी होणाऱ्या नेत्यांचे स्वागत केले. शहरात एकात्मतेचे आणि भक्तिभावाचे वातावरण पाहायला मिळाले.
Comments
Post a Comment