*चंद्रपुर जिल्हा बँकेची बहुप्रतिक्षित जनकल्याणकारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना होणार सुरु.

*चंद्रपुर जिल्हा बँकेची बहुप्रतिक्षित जनकल्याणकारी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना होणार सुरु*

चंद्रपूर :

भारतीय जनता पार्टीची सत्ता असलेल्या चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बहुप्रतिक्षित वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना दिनांक ११ ऑक्टोंबर २०२५ पासून आश्विन वद्य पंचमी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्म्रुतीदिनानिमित्य या दिनाचे औचित्य साधून सदर योजना सुरु होत आहे.

ही योजना सुरु व्हावी यासाठी मोठ्या प्रमाणात शेतकरी व सभासदांची मागणी होती. आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन झालेल्या चंद्रपूर जिल्हा बँकेत, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, चंद्रपूर जिल्हाचे पालकमंत्री तथा आदिवासी विकासमंत्री नामदार अशोकजी उईके,राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष तथा माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहिर, आमदार कीर्तिकुमार उर्फ बंटी भांगडीया, आमदार किशोर जोरगेवार, आमदार करण देवतळे यांच्या प्रमुख मार्गदर्शनात व चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रवींद्र शिंदे, उपाध्यक्ष संजय डोंगरे तथा संचालक मंडळाच्या पुढाकाराने सदर योजना सुरु करण्यात येत आहे.

महाराष्ट्र राज्यातील सहकार क्षेत्रात जिल्हा बँकांचा विचार करता चंद्रपूर जिल्हा बँकेचा हा पहिलाच सामाजिक उपक्रम आहे, हे विशेष! या अगोदर काही वर्षांपूर्वी सदर योजना सुरु करण्यात आलेली होती मात्र राजकीय विरोधकांच्या हस्तक्षेपातून योजना बंद करावी लागली होती. आता नव्या स्वरूपात ही योजना सुरु होत आहे.

ही योजना चंद्रपुर जिल्हयातील रहीवासी करीता चंद्रपुर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संलग्न सेवा/वि.का./आदिवासी वि.का. सहकारी संस्थेचे नियमीत कर्जफेड करणारा किंवा चालु कर्जदार सभासदाकरीता असणार आहे.या योजनेअंतर्गत बँकेमार्फत देण्यात येणारी आर्थीक मदत ही अर्जदार शेतकरी कर्जदार कुटूंबातील सदस्य (आई, वडील, पती, पत्नी, मुलगा, अविवाहीत मुलगी, मय्यत मुलाचा मुलगा, मुलगी, विधवा सुन) यांनाच लागु राहील. तसेच हिंदु वारसा कायदा ७५ (२) या योजनेत लागु असणार आहे. या योजनेअंतर्गत बँकेमार्फत आर्थीक मदत ही उपचार/शस्त्रक्रिया खर्चाच्या ३० टक्के किंवा जास्तीत जास्त रु.४०,०००/- या पैकी जे कमी असेल ती देण्यात येईल. यामध्ये कोणत्याही प्रकारचा कर्करोग (कॅन्सर), हृदयासंबंधी आजारावरील उपचार व शस्त्रक्रिया, डोक्यासंबंधी आजार व त्यावरील उपचार व शस्त्रक्रिया, अपघातात जखमी झाल्यास त्यावरील उपचार व शस्त्रक्रिया या करीता (अपघात - वाहनाने, झाडावरुन पडल्याने, विज पडल्याने, साप अथवा वन्य प्राण्याचे हल्याने झाल्यास) व या आजाराव्यतीरीक्त इतर आजारावरील उपचार शस्त्रक्रिया करीता या योजनेच्या माध्यमातून मदत मिळणार आहे.

ही कल्याणकारी योजना सुरू केल्याबद्दल चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे समस्त संचालक मंडळाचे जिल्हा भरातून व शेतकरी बांधव यांचे कडून अभिनंदन करण्यात येत आहे.

वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजना मध्यवर्ती सहकारी बँक चंद्रपुर चे वतीने सुरु करीत आहात.

Comments