वरोरा
23/9/2025
माढेळी विविध कार्यकारी संस्थेच्या वतीने चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष व संचालक यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला. श्री. प्रकाशचंद मुथा यांच्या अध्यक्षतेखाली मुथा भवन, माढेळी येथे हा सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. या प्रसंगी माझ्यासह जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री. रविंद्र शिंदे आणि संचालक श्री. जयंतराव टेमुर्डे यांचा सत्कार करण्यात आला.
सत्कार सोहळ्याबद्दल मी माढेळी विविध कार्यकारी संस्थेचे सर्व सभासद, पदाधिकाऱ्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले. हा सन्मान सहकार क्षेत्रातील कार्य करण्याची उर्जा आणि प्रेरणा देणारा आहे अशी भावना यावेळी व्यक्त केली. भविष्यात जिल्ह्यातील सहकार चळवळीला नवे बळ देण्यासाठी आपण सर्व जण मिळून एकजुटीने काम करणार आहोत, असा विश्वास या प्रसंगी व्यक्त केला.
या कार्यक्रमाला माढेळी गावाचे सरपंच श्री. देवानंद महाजन, संस्थेचे सर्व सभासद, ग्रामस्थ, युवक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहिले.
*********
Comments
Post a Comment