विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्राधान्याने मांडणार आमदार करण देवतळे यांची ग्वाही

विद्यार्थ्यांचे प्रश्न शासन दरबारी प्राधान्याने मांडणार 
,आमदार करण देवतळे यांची ग्वाही 

वरोरा : अखिल भारतीय विद्यार्थी परिषद ही विद्यार्थ्यांच्या न्याय व हक्कासाठी लढणारी संघटना आहे. अशा संघटनेमार्फत येणारे विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राधान्याने शासन दरबारी मांडून ते सोडविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आमदार करण देवतळे यांनी केले. 
ते वरोरा येथील अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात अध्यक्ष स्थानावरून बोलत होते. 
आज शुक्रवार दि.५ सप्टेंबर रोजी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालय सभागृहात तत्कालीन  आणि  विद्यमान पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी सर्वप्रथम अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या गणपतीच्या मूर्तीची महाआरती आमदार करण देवतळे यांच्या हस्ते करण्यात आली.
 यानंतर आयोजित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात प्रमुख अतिथी म्हणून भाजपाचे जेष्ठ नेते बाबा भागडे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य तथा भाजपाच्या डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर सागर वझे, नागपूर विद्यापीठाच्या सिनेट सदस्या शुभांगी नक्षीने (उंबरकर), वरोरा नगर मंत्री आदित्य वरखडे, व्यासपीठावर उपस्थित होते. 
या कार्यक्रमात डॉक्टर सागर वझे यांनी प्रास्ताविकातून एबीव्हीपी च्या कार्याचा आढावा मांडला. तसेच कार्यालय सुरू करण्यामागील पार्श्वभूमी त्यांनी विशद केली. सिनेट सदस्या शुभांगी नक्षीने यांनी आपल्या मनोगतातून अखिल भारतीय विद्यार्थी परिषदे करिता कार्यालय उपलब्ध करून दिल्याबद्दल डॉ. सागर वझे यांना धन्यवाद दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली काळे हिने  तर आभार नगर मंत्री आदित्य वरखडे यांनी मानले. या कार्यक्रमाला अनिल वरखडे, विलास दारापूरकर, राजू जाजुर्ले, ओजस वरखडे,गणेश नक्षीने, जगदीश तोटावर, एबीव्हीपीच्या वरोरा -भद्रावती विस्तारक अतिक्षा भांडेकर, नगरसहमंत्री रिया बालवंश, नगर राष्ट्रीय कला मंच सावरी हांडे, सहसंयोजक एसएफएस वैष्णवी बालवंश, प्रसिद्ध प्रमुख प्रणय खेरे यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
**********

Comments