चित्रकला विषय विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवते.
चित्रकला शिक्षक कांबळे सर.
वरोरा
चेतन लूतडे
महाराष्ट्र राज्य कला शिक्षण मंडळ, मुंबई विभागातर्फे
शासकीय रेखाकला (एलिमेंटरी व इंटरमिजिएट ड्रॉईंग ग्रेड) परीक्षा २०२५ चे आयोजन दिनांक २४ सप्टेंबर, २०२५ ते दिनांक २७ सप्टेंबर, २०२५ या कालावधीमध्ये करण्यात आले आहे.
महाराष्ट्रातील चित्रकला परीक्षेत बऱ्याच विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शवला असून, वरोरा तालुक्यातील जवळपास आठशे विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या कला, क्रीडा ,कार्यानुभव या विषयासाठी खाजगी आणि सरकारी क्षेत्रात शिक्षकांचा अभाव असून या विषयासाठी बऱ्याच विद्यार्थ्यांची दिवसेंदिवस उदाणसीता वाढत चालली आहे. त्यामुळे शैक्षणिक विभागाकडून या विषयासाठी भरीव मदत व लक्ष देण्याची गरज आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात शिक्षण विभागातर्फे राबविण्यात येणाऱ्या बऱ्याच शाळेमध्ये हा विषय सुद्धा शिकवल्या जात नाही. त्यामुळे भविष्यात विद्यार्थीच्या कलागुणांना वाव न मिळाल्याने विद्यार्थी निष्क्रिय होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मात्र वरोरा तालुक्यातील लोकमान्य विद्यालयात चित्रकला व क्रीडा विषयाला बाकीच्या विषया प्रमाणे महत्त्व प्राप्त करून दिले आहे. त्यामुळेच या शाळेतील विद्यार्थी चित्रकला व क्रीडा, संगीत स्पर्धेत प्राविण्य प्राप्त करून भविष्य घडवित आहे. याचे सर्व श्रेय विद्यार्थ्यांनी शिक्षकांना दिले आहे.चित्रकला विषय विद्यार्थ्यांची आकलन शक्ती वाढवते. इतर विषया प्रमाणे विद्यार्थ्यांना भवितव्य घडवता येते. असे मत लोकमान्य विद्यालयाचे चित्रकला शिक्षक कांबळे सर यांनी सांगितले.
******************
Comments
Post a Comment