आंनद निकेतन महाविद्यालयात पालक-शिक्षक संघाची
सर्वसाधारण सभा संपन्न
वरोरा-
आनंद निकेतन महाविद्यालयात पालक- शिक्षक संघाची सर्वसाधारण सभा मोठ्या उत्साहात दिनांक २० सप्टेंबर २०२५ रोजी
आयोजित करण्यात आली. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून प्राचार्य डॉ.मृणाल काळे तर प्रमुख मार्गदर्शन प्रा. डॉ.निलेश उगेमुगे, तसेच उपप्राचार्य प्रा. सौ.राधा सवाने यांची प्रमुख उपस्थिती लाभली.या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून,श्रद्धेय बाबा आमटे व साधनाताई आमटे यांच्या प्रतिमेच्या पूजनाने आणि 'तू बुद्धी दे ,तू तेज दे' या प्रार्थनेने झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना प्रा. विश्वजीत गजरे यांनी शिक्षक,विद्यार्थी व पालक यांच्या समन्वयाचे महत्व सांगितले. तर मागील सत्रातील पालक-शिक्षक संघाच्या सभेचे अहवाल वाचन माजी सचिव प्रा.रमेश पळसुटकर सरांनी केले. नवीन कार्यकारीणीमध्ये पालकामधून श्री.विजयराव थुटे यांची उपाध्यक्ष, तर सहसचिव म्हणून सौ.शिल्पा गावंडे यांची निवड करण्यात आली.
जाहिरात
कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक प्रा.डॉ.निलेश उगेमुगे यांनी तंत्रज्ञान आणी कौशल्याचे महत्व विशद केले.तंत्रज्ञानाचा वापर विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरीता व्हावा,यासाठी पालकांनी व शिक्षकांनी प्रयत्न करावे , तसेच विद्यार्थ्यांनी स्वतःच्या भविष्यासाठी आर्टिफिशियल इंटेलिजन्स च्या जमान्यात तंत्रज्ञान व कौशल्य आत्मसात करणे काळाची गरज आहे.असे प्रदीपादन केले. प्रमुख अतिथी उपप्रचार्य सौ.राधा सवाने मॅडम यांनी पालकांनी शिक्षकांच्या संपर्कात राहून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक विकासासाठी, उज्वल भविष्याच्या वाटचालीसाठी पालक शिक्षक संघ अत्यंत महत्त्वाचा दुवा आहे असे सांगितले. अध्यक्षीय मार्गदर्शनामध्ये महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मृणाल काळे यांनी सांगितले की, आधुनिक युगात विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान आणि कौशल्य शिकण्यासाठी सदैव पुढे यावे, तसेच मुलांनी स्वतःच्या प्रगतीसाठी व सर्वांगीण विकासासाठी,आणि ध्येय गाठण्यासाठी खचून न जाता सकारात्मक दृष्टीने सतत प्रयत्नशील असणे आवश्यक आहे. तेव्हाच आपण यशाचे शिखर गाठू शकाल. त्यानंतर शिक्षक दिनाचे औचित्य साधून ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त मुलांसाठी स्वयंशासनाचा कार्यक्रम घेण्यात आला.
या स्वयंशासनाच्या विजेत्यांचे बक्षीस मान्यवरांच्या हस्ते देऊन मुलांना गौरविण्यात आले.बक्षीस वितरणाची धुरा प्रा.सौ.स्मिता हुमणे यांनी सांभाळली. त्यानंतर पालकांमधून नवनिर्वाचित उपाध्यक्ष श्री.विजयराव थुटे,सहसचिव सौ.शिल्पा गावंडे, श्री.अरविंद गायकवाड, सौ.सुचिता खिरटकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. या कार्यक्रमाचे उत्कृष्ट सुत्रसंचालन सचिव नीरज आत्राम यांनी केले. तर अतिथी मान्यवरांचे आणि उपस्थित्यांचे आभार सहसचिव प्रा. डॉ.दीप्ती चिटणीस यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता पसायदानाने करण्यात आली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता विविध समितीच्या शिक्षकांनी सहकार्य करून मोलाचा वाटा उचलला. या कार्यक्रमाला बहुसंख्य पालक वर्ग, शिक्षक वृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, आणि विद्यार्थी यांची उपस्थिती लाभली.
जाहिरात
Comments
Post a Comment