आणि बच्चुभाऊ कडू माढळीच्या सभेला आलेच नाही. मी माढळीला नक्की येईल बच्चुभाऊ कडूंचे फोनवरून आश्वासन

आणि बच्चुभाऊ कडू माढळीच्या सभेला आलेच नाही.  मी माढळीला नक्की येईल बच्चुभाऊ कडूंचे फोनवरून आश्वासन                                       

अनिल नौकरकार 

 माढेळी: प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचे सभा आज 23 सप्टेंबरला नेताजी सुभाष चंद्र बोस चौकामध्ये नियोजित होती परंतु अचानक प्रकृती बिघडल्यामुळे ते येऊ शकले नाही असे वरोरा तालुका संघटक अमोल काटकर यांनी सांगितले परंतु यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी पसरलेली होती.           
        
माढेळी येथे तालुका आयोजक अमोल काटकर यांच्या वतीने माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांची सभा शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी तसेच शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा, दिव्यांगांना सहा हजार रुपये मानधन मिळावे, चंद्रपूर जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव द्यावा या मागणीसाठी सभेतून बच्चुभाऊ कडू गर्जना करतील अशी आशा शेतकऱ्यांना होती यासाठी यवतमाळ जिल्ह्यातील दिंदोडा , मार्डी, गाडेगाव तर वर्धा जिल्ह्यातील शेकापूर धानोरा तसेच माढळी व नागरी परिसरातील पाच ते सहा हजार शेतकरी बच्चुभाऊ कडूंची भाषण ऐकण्यासाठी एकत्र आले होते परंतु बच्चुभाऊ न आल्यामुळे शेत कऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे सकाळी दहा वाजेपासूनच माढेळी गावात शेतकऱ्यांची गर्दी जमू लागली होती सत्यपाल महाराज यांचे शिष्य प्रदीप पाल चौधरी यांच्या सप्त खंजिरी भजनाने लोक भारावून गेले बच्चुभाऊ कडू खांबाडा येथे मोर्चाला संबोधित करत असताना त्यांची प्रकृती अचानक बिघडल्याची समजते परंतु त्यांनी फोनवरून तालुका संघटक अमोल काटकर व शेतकऱ्याची संवाद साधून मी माढेली येथे नक्की येईल असे सांगितले जाहीर सभेला प्रहार कार्याध्यक्ष बबलु जंजाळ,विदर्भ प्रमुख गजू कुबडे,चंद्रपूर जिल्हा संपर्क प्रमुख प्रवीण हेडवे,जिल्हाप्रमुख शेरखान पठाण यांनी संबोधित केले.

पाथरी येथील सभा

Comments