वरोरा येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते कल्पतरू गणेश मंडळाची महाआरती संपन्न; शेतकऱ्यांसाठी आशीर्वादाची प्रार्थना
वरोरा येथे खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते कल्पतरू गणेश मंडळाची महाआरती संपन्न; शेतकऱ्यांसाठी आशीर्वादाची प्रार्थना
वरोरा प्रतिनिधी
वरोरा : गणेशोत्सवाच्या निमित्ताने गांधी चौक येथील कल्पतरू गणेश मंडळाची भव्य महाआरती खासदार प्रतिभाताई धानोरकर यांच्या हस्ते संपन्न झाली. या प्रसंगी बाप्पाच्या चरणी नतमस्तक होून सर्वांच्या सुखासमृद्धीसाठी मनोभावे प्रार्थना करण्यात आली. आरतीनंतर खासदार प्रतिभाताई यांनी मंडळाच्या सदस्यांसोबत तसेच उपस्थित नागरिकांशी संवाद साधून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी आशीर्वाद मागण्यास विशेष महत्त्व दिले. त्यांनी गणपती बाप्पाकडे प्रार्थना करताना म्हटले, "हे बाप्पा, आमच्या अन्नदात्या शेतकऱ्यांवर सदैव तुझी कृपादृष्टी राहो. पूरग्रस्त शेतकऱ्यांना या संकटावर मात करण्याचे सामर्थ्य दे. त्यांच्या मेहनतीला यश लाभो आणि दरवर्षीच्या पिकाला भरभराटी येवो. संकटाच्या या काळात त्यांना धैर्य देवो आणि सर्वांना समृद्धी दे."
चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राच्या खासदार प्रतिभाताई धानोरकर यांनी यापूर्वी वरोरा शहरातील विविध गणेश मंडळांच्या भेटी घेतल्या व त्यांनी केलेल्या सामाजिक व धार्मिक व सांस्कृतिक कार्याबद्दल शुभेच्छा व्यक्त केल्या.
कल्पतरू गणेश मंडळाच्या महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, ज्यामध्ये हजारो भाविक भक्तांनी प्रसादाचा आस्वाद घेतला. मंडळाचे अध्यक्ष चेतन विजय शर्मा व शशीभाऊ चौधरी तसेच सर्व सदस्यानी या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी अथक प्रयत्न केले.
Comments
Post a Comment