"पीएम श्री विद्यालयाची जीर्ण इमारत धोक्याची पालकांची चिंता, खासदारांकडे निवेदन"

"पीएम श्री विद्यालयाची जीर्ण इमारत धोक्याची  पालकांची चिंता, खासदारांकडे निवेदन"

बातमी:
चेतन लूतडे 
चांदा/वरोरा: आयुध निर्माणी चांदा येथील पीएम श्री केंद्रीय विद्यालयाची इमारत सध्या अत्यंत जीर्ण आणि धोकादायक अवस्थेत असल्याचे स्पष्ट झाले आहे. या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला असून, शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.

ह्या बाबतीत चर्चेसाठी भद्रावती तालुक्यातील पालकांची गुरुवारी वरोरा येथील खासदार जनसंपर्क कार्यालयात बैठक झाली. पालकांनी स्पष्ट केले की जुन्या आणि धोकादायक इमारतीमुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेबाबत सतत चिंता वाटत असल्याचे तसेच ऑनलाइन शिक्षण पद्धतीमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीस मोठे नुकसान होत असल्याचे सांगितले. एकीकडे देशाचे ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेचे धोरण राबविण्याचे प्रयत्न चालू असताना दुसरीकडे विद्यार्थ्यांना मूलभूत शैक्षणिक सुविधा मिळत नाहीत हे चित्र दुर्दैवी असल्याचे मत खासदार धानोरकर व्यक्त केले.
******************************
*जीर्ण केंद्रीय विद्यालयाची दुरुस्ती करा; खासदार धानोरकर यांचे आदेश*

*पालकांच्या तक्रारीनंतर खासदार ॲक्शन मोडवर; अधिकाऱ्यांशी साधला संपर्क*

भद्रावती येथील केंद्रीय विद्यालय, आयुध निर्माणी (चांदा)ची जीर्ण झालेली इमारत विद्यार्थ्यांच्या जीवासाठी धोकादायक ठरत आहे. या गंभीर प्रश्नाची दखल घेत खासदार प्रतिभा धानोरकर यांनी तातडीने संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधून इमारतीची दुरुस्ती करण्याचे आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी पर्यायी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले आहेत. पालकांनी दिलेल्या निवेदनानंतर खासदार धानोरकर यांनी तात्काळ कार्यवाही सुरू केली आहे.

आज वरोरा येथील जनसंपर्क कार्यालय येथे विद्यार्थ्यांच्या पाल्यांची खासदार प्रतिभा धानोरकर यांची भेट घेतली. त्याची भेट घेऊन संपूर्ण परिस्थितीची माहिती दिली. यावेळी जयश्री नितीन डोंगरे, भावना वाढई, नाजूका नंदेकर, प्रिया निमसरकार, मिनाक्षी डेकाटे, सारिका कोठे, विद्या नरंजे, सविता नेरुलकर उपस्थित होते. 

खासदार प्रतिभा  धानोरकर म्हणाल्या, "विद्यार्थ्यांची सुरक्षा हे आमचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जीर्ण इमारतीमुळे विद्यार्थ्यांचे शिक्षण थांबू नये आणि त्यांना सुरक्षित वातावरणात शिक्षण घेता यावे यासाठी सर्व आवश्यक पावले उचलली जातील. लवकरच यावर ठोस कार्यवाही केली जाईल आणि पालकांनाही याबाबतची माहिती दिली जाईल."
...............

Comments