अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने आरोग्य शिबिराचे आयोजन संपन्न.ऑटो संघटनेचा सर्वधर्म समभाव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.
ऑटो संघटनेचा सर्वधर्म समभाव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक.
अध्यक्ष.बाळू उपलंचिवार यांचे नेतृत्वात दिला सामाजिक व संघटनात्मक एकतेचा परिचय.
सर्व पक्षीय नेते व कार्यकर्ते एकजुटीने बाप्पाच्या चरणी.
तालुका प्रतिनिधी( भद्रावती):-
मुख्यमंत्री सहायता निधी धर्मदाय रुग्णालय मदत कक्ष व ऑटोरिक्षा असोसिएशन अष्टविनायक गणेश मंडळाच्या वतीने दिनांक 3 रोज बुधवार ला स्थानिक नवीन बस स्थानक परिसरातील ऑटो स्टॅंड येथे आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सकाळी दहा ते तीन या वेळात सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले या आरोग्य सेवेचे उदघाटन माजी नगराध्यक्ष अनिल धानोरकर यांच्या शुभहस्ते पार पडले.प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा शहर अध्यक्ष सुनील नामोजवार, माजी उपाध्यक्ष प्रफुल चटकी, ऑटो संघटनेचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार आनंद चेट्टी ,पत्रकार सुनील बिपटे आदी मान्यवर उपस्थितीत होते.
या शिबिरात विविध आजारावर तपासण्या व औषधोपचार करण्यात आले.तालुका वैद्यकीय कार्यालय मार्फत अनुभवी डॉक्टर व त्यांची टीम यांनी विशेष योगदान दिले.
अनेक स्त्री पुरुषांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्य सेवेचा लाभ घेतला .
ऑटोरिक्षा असोसिएशनचे अध्यक्ष बाळू उपलंचीवार, उपाध्यक्ष सनमोहन केशवन, यशस्वी सहारे, राजू बालपप्पा, प्रकाश मेंढे, रमेश पाटील, राहुल रामटेके, अझहर शेख, सरफराज पठाण, संजय शेंडे, गणेश गजलेकर, शशी कवाडे आदींनी या आरोग्य सेवेच्या यशस्वी आयोजनात विशेष योगदान दिले.
याप्रसंगी शहर अध्यक्ष सुनील नामोजवार यांनी हे अष्टविनायक गणेश मंडळ सर्वधर्म सम भावाचे प्रतीक असून हिंदू, बौद्ध, मुस्लिम व इतरही संस्कृती व विविध उत्सव साजर करणार व सर्व जाती धर्मात एकता निर्माण करणार मंडळ असल्याचे सांगितले.
Comments
Post a Comment