भद्रावती
चेतन लूतडे
चंद्रपूर : स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरीयल रविंद्र शिंदे चॅरिटेबल ट्रस्ट, चंद्रपूर यांच्या वतीने 'शिक्षक दिन' सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. समस्त सेवानिवृत्त, कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा जेष्ठ नागरिक यांना या सोहळ्यात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले आहे.
जाहिरात
कार्यक्रमाचे तपशील:
· दिनांक : शुक्रवार, ५ सप्टेंबर २०२५
· वेळ : दुपारी १२ वाजता
· स्थळ : श्री मंगल कार्यालय, मेन रोड, भद्रावती
मुख्य पाहुणे: कार्यक्रमाचेअध्यक्षपद माननीय श्री. सुधाकर आडबाले (आमदार, शिक्षक मतदारसंघ) यांच्या हस्ते तर माननीय श्री. हंसराज अहीर (अध्यक्ष, राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग तथा माजी गृहराज्यमंत्री, भारत सरकार) यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार आहे.
यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. करण देवतळे (आमदार, ७५ वरोरा-भद्रावती विधानसभा), डॉ. अशोक जिवतोडे (ओबीसी नेते तसेच अध्यक्ष, चांदा शिक्षण प्रसारक मंडळ), प्रा. श्रीकांत पाटील (अध्यक्ष, लोक शिक्षण संस्था, वरोरा) आणि श्री. रविंद्र शिंदे (अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक) उपस्थित राहतील.
संस्थेचे उद्देश आणि उपक्रम: शिक्षकांनात्यांच्या आयुष्यभराच्या शैक्षणिक व सामाजिक योगदानाबद्दल सन्मानित करणे हा या सोहळ्याचा मुख्य हेतू आहे. ही संस्था खालील महत्त्वाच्या उपक्रमांद्वारे समाजकारण करत आहे:
स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरियल रविंद्र शिंदे चॅरीटेबल ट्रस्ट चंद्रपूर
कोरोणा प्रादुर्भावाच्या काळापासून स्व. श्रीनिवास शिंदे मेमोरिअल रवि शिंदे चॅरीटेबल ट्रस्टचे वरोरा व भद्रावती तालुक्यात आरोग्य, सामाजिक, क्रीडा, अभ्यासिका, व्यसनमुक्ती, महिला सक्षमीकरण, युवा आदी क्षेत्रात भरीव असे कार्य सुरू आहे. सहकार व सामाजिक क्षेत्रात सक्रिय असलेले रवि शिंदे यांनी या ट्रस्टची लोकोपयोगी कार्याकरीता स्थापना केली आहे. ते ट्रस्टचे संस्थापक अध्यक्ष आहेत. ट्रस्टद्वारे ग्रामीण व शहरी भागात श्रद्धेय बाबा आमटे आरोग्य अभियान सुरु आहे. दिव्यांगाणा सायकल वाटप, कॅन्सर व दुर्धर आजारग्रस्त रुग्णांना मदतकार्य, कोरोनाणे मृत, आत्महत्याग्रस्त, निराधार, गरीब गरजू पालकांच्या पाल्यांचा मोफत विवाह सोहळा, गरीब विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी दत्तक योजना, गावागावात अभ्यासिकेला पुस्तक भेट व आर्थिक सहकार्य, शेतकरी, शेतमजूर, पाळीव प्राणी यांना मदतकार्य, अवैध व्यवसाय मुक्त गाव अभियान, क्रीडा स्पर्धा, लघु व्यावसायिकांना मदत, आत्महत्येच्या मार्गावर असलेल्यांना धीर देण्याचे कार्य, सामाजिक जागृती हेतूने विविध बौध्दिक मार्गदर्शनपर उपक्रम, युवकांना प्रोत्साहन देण्यासाठी क्रीडा स्पर्धा, आदी विविधांगी कार्य सुरू आहेत, व दिवसेंदिवस ट्रस्टच्या कार्याचा आलेख वाढत आहे. अनेक लोकोपयोगी सामाजिक कार्याची भर पडत आहे व ट्रस्टचा आवाका वाढत आहे. त्यानुसार ट्रस्टला जिल्हाभरातून विविध क्षेत्रातील दिग्गजांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभत आले आहे.
संस्थेचे मार्गदर्शन अध्यक्ष प्रा. धनराज आस्वले, सचिव सौ. रुपाली रवींद्र शिंदे आणि कोषाध्यक्ष श्रीमती सुषमा शिंदे यांच्या हस्ते होत आहे.
सर्व सेवानिवृत्त आणि कार्यरत शिक्षक, कर्मचारी तथा जेष्ठ नागरिक बंधू-भगिनींना या सन्मान सोहळ्यात सहभागी व्हावे, असे आवाहन संस्थेतील पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
******************************
जाहिरात
Comments
Post a Comment