आमदार करन देवतळे यांची वरोरा शहरातील गणेश मंडळांना भेट; भव्य सजावट आणि भक्तिभावाचे कौतुक कल्पतरू गणेश मंडळाच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

आमदार करन देवतळे यांची वरोरा शहरातील गणेश मंडळांना भेट; भव्य सजावट आणि भक्तिभावाचे कौतुक

कल्पतरू गणेश मंडळाच्या सामाजिक कार्यास शुभेच्छा व्यक्त केल्या.

वरोरा : नगरभर चालू असलेल्या गणेशोत्सवाच्या आनंददायी वातावरणात वरोरा शहरातील विविध सार्वजनिक गणेश मंडळांना भेट देऊन गणरायाचे मंगलमय दर्शन आमदार श्री. करन देवतळे यांनी घेतले. यावेळी विविध समस्या  त्यांनी जाणून घेतल्या. शहरातील सर्व गणेश मंडळाचे कार्य कौतुकास्पद असून गणेश मंडळांनी सामाजिक व धार्मिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करीत आहेत. 
कल्पतरू गणेश मंडळाने आरोग्य शिबिर शहरात राबवून  समाजातील गरजू व्यक्तींना मोलाची मदत केली आहे. अशा प्रकारचे कार्य गणेश मंडळाने आयोजित करून समाज जागृतीचे व आरोग्य विषयक कार्य करावे.
नॅशनल गणेश मंडळाचे सुंदर देखावा, न्यू शिवशक्ती गणपती भव्य दिव्य गणपती, विष्णू अवतारात असलेली नटराज गणपतीची मूर्ती, मिलन चौकातील 2100 चॉकले पासून बनवलेला गणपती, रिद्धी आणि सिद्धी सोबत असलेला गणपती मठाचा राजा, जय भारती चा भव्य दिव्य गणपती, वीर मंडळाचा गणपती असे अनेक गणेश मंडळांनी सुंदर गणपती बसविली असून सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या.

या प्रसंगी शहरातील विविध मंडळांनी भाविक नागरिकांच्या उत्साहातून व सर्व कार्यकर्त्यांच्या अथक परिश्रमांतून साकारलेली भव्य सजावट, देखावे आणि सांस्कृतिक उपक्रम खरोखरच मन मोहवणारे व कौतुकास्पद आहेत, असे आमदार देवतळे यांनी व्यक्त केले.

या दर्शन प्रसंगी मंडळातील सर्व पदाधिकारी, सदस्य तसेच भारतीय जनता पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून भक्तिभावाने सहभागी झाले. सर्वत्र भक्ती, श्रद्धा, एकता आणि सामाजिक ऐक्याचे दर्शन घडवणारे हे क्षण खरोखरच अविस्मरणीय ठरले, असे त्यांनी सांगितले.
'गणरायाचे आशीर्वाद सर्वांवर राहो', हीच प्रार्थना आमदार देवतळे यांनी शेवटी व्यक्त केली.

***************




Comments