नागपूर
आज नागपूर येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने "संविधान सत्याग्रह" पदयात्रेचे भव्य आयोजन करण्यात आले. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष श्री. हर्षवर्धन सपकाळ आणि महात्मा गांधींचे पणतू श्री. तुषार गांधी यांच्या नेतृत्वाखाली या पदयात्रेचा शुभारंभ ऐतिहासिक दीक्षाभूमी येथून झाला. संविधानाचे रक्षण, देशातील एकता, बंधुता आणि शांततेचा संदेश जनतेपर्यंत पोहोचवण्याच्या उद्देश असून, या पदयात्रेचा समारोप २ ऑक्टोबर रोजी सेवाग्राम आश्रम, वर्धा येथे होणार आहे.
राज्य तसेच देशभरात संविधानावर घाला घालण्याचे प्रयत्न सुरू असताना संविधानाच्या संरक्षणासाठी संघर्ष करण्याची वेळ आता आली असल्याचा ठाम संदेश या पदयात्रेतून देण्यात आला. विशेष म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शतकपूर्ती दिनानिमित्त भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला दिलेल्या पवित्र संविधानाची प्रत संघाला प्रदान करण्यात येईल.
या ऐतिहासिक पदयात्रेत मी आज प्रत्यक्ष उपस्थित राहून संविधान रक्षणाच्या या लढ्यात माझा ठाम सहभाग नोंदवला आणि देशातील लोकशाही मूल्यांचे जतन व संविधानाची अखंडता राखण्यासाठी एकजुटीचा संकल्प केला. यावेळी माझ्यासह सुनिल केदार, खा. श्यामकुमार बर्वे, आ. अभिजीत वंजारी, मा.आ. सुभाष धोटे, श्रीमती सुषमाताई अंधारे यांसह काँग्रेसचे अनेक मान्यवर पदाधिकारी व असंख्य कार्यकर्त्यांची उत्स्फूर्त उपस्थिती लाभली.
Comments
Post a Comment