चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. बँकेचे अध्यक्ष माननीय श्री.रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांची विविध योजनांची घोषणा.

चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न. 

बँकेचे अध्यक्ष माननीय श्री.रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांची विविध योजनांची घोषणा. 


चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची 40 वी वार्षिक सर्वसाधारण सभा दिनांक 30 सप्टेंबर 2025 रोजी बँकेच्या मा. सा.कन्नमवार सभागृहात बँकेचे अध्यक्ष माननीय श्री रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील संपन्न झाली. 
सदर सभेत बँकेचे अध्यक्ष माननीय श्री रवींद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी सांगितले की सन 2024-25 या वर्षातील असलेल्या संस्थांच्या हिस्से बाकी वर दैनिक पद्धतीने सहा टक्के लाभांश जाहीर केले. तसेच अल्पमुदती थकीत पीक कर्ज, थकीत रूपांतर कर्ज व मयत सभासदाकडील थकीत पीक कर्ज याकरिता एक रकमी कर्ज परतफेड योजना नव्याने सुरू करण्यात आली तसेच  कर्ज वाटप प्रक्रिया सुलभ करण्यासाठी बिगर शेती पूरक कर्ज धोरण व शेतीपूरक माध्यम मुदती कर्ज धोरणात विविध बदल व सुधारणा करण्यात आली तसेच शेतीमाल तारण कर्ज योजना व ड्रोन फवारणी योजना नवीन धोरण करण्यात आल्याची माहिती बँकेचे अध्यक्ष माननीय श्री रविंद्र श्रीनिवासराव शिंदे यांनी दिली. व पुढे त्यांनी वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज शेतकरी कल्याण निधी योजनेस मान्यता देण्यात आल्याचे सांगितले. 


सभेला एकूण 194 सभासद उपस्थित होते सर्वांना वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता व भगवी टोपी देऊन सर्व सभासदांचे स्वागत करण्यात आले सखोल चर्चेसह उपस्थित संस्था प्रतिनिधीचे मतांची नोंद घेऊन सदर सभा संपन्न झाली. 
सदर सभेला माननीय श्री संजय गुलाबराव डोंगरे बँकेचे उपाध्यक्ष, संचालक सर्व मा. श्री. संतोषसिंह चंदनसिंहजी रावत , यशवंत तुकारामजी दिघोरे , सौ नंदाताई वसंतराव अल्लुरवार,निशिकांत राजेंद्र बोरकर, सुदर्शन भगवानराव निमकर ,विजय चिंतामणजी बावणे ,जयंता मोरेश्वर टेंभुर्डे , दामोधर श्रावणजी मिसार ,दिनेश दादाजी चोखारे ,अनिल सदाशिवराव वाढाई ,विलास आबाजी मोगरकर ,ललित काशीरामजी मोटघरे, गजानन वासुदेवराव पाथोडे, रोहित चरणदास बोम्मावार,गणेश जयराम तर्वेकर, उल्हास नागोरावजी करपे , आवेशखान अमानखान पठाण, हे उपस्थित होते आणि बँकेचे मुख्य कार्यकारी श्री राजेश्वर भि.कल्याणकर यांनी सभेचे प्रस्ताविक केले.
*****"*********"****

Comments