वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक

वरोरा नगर परिषदेच्या सजावटीदार लाईट निविदा रद्द करण्याची मागणी; विरोधक आक्रमक वरोरा: वरोरा नगर परिषदेने अंबादेवी मंदिर ते बशीर ऑईल मिलपर्यंत सजावटीदार स्ट्रीट लाईट बसविण्यासाठी काढलेल्या निविदेमुळे शहरातील राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विरोधी गटातील नगरसेवकांनी ही निविदा रद्द करण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांकडे केली असून, हा शासकीय निधीचा गैरवापर असल्याचा आरोप केला आहे. विरोधी गटाच्या नगरसेवकांनी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात, प्रस्तावित मार्गावर सध्या असलेल्या स्ट्रीट लाईट पूर्णपणे सुस्थितीत असल्याचे म्हटले आहे. नगरसेवक कुरेकर यांनी नमूद केले की, जनतेकडून अशा कामाची कोणतीही मागणी नसताना नवीन सजावटीदार लाईट बसविणे म्हणजे प्रशासनाचा गैरकारभार आहे. विरोधकांनी केलेल्या मुख्य आक्षेपांपैकी एक म्हणजे दलित वस्ती प्रभागातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष करून हा प्रकल्प राबविण्यात येत आहे. निवेदनात म्हटले आहे की, दलित वस्ती प्रभागात नाली बांधकाम, रस्ते, हँडपंप दुरुस्ती व शौचालये यासारख्या मूलभूत गरजा असताना केवळ दिसायला आकर्षक अशा सजावटीदार लाईटवर खर्च करणे संशयास्पद आहे. ...

*माजरी पोलिस स्टेशनमध्ये जमा असलेल्या मोटार सायकलींचा विक्री लिलाव*

*माजरी पोलिस स्टेशनमध्ये जमा असलेल्या मोटार सायकलींचा विक्री लिलाव*

चंद्रपूर, दि. 28 : पोलिस स्टेशन माजरी, येथे बरेच कालावधीपासुन जमा असलेली जंगम मालमत्तेबाबत कोणताही व्यक्ती त्याचा हक्क सांगण्याकरीता किंवा प्रस्थापित करण्यासाठी हजर न झाल्याने एकूण 37 मोटार सायकल, (शासकीय किंमत 1 लक्ष 88 हजार 210 रुपये) यांचा लिलाव होणार आहे. नमुद वाहने टेंडरद्वारे जिथे आहे तिथे वाहनाचे इंजिन व चेचिस नंबर मिटवून व वाहनाची विल्हेवाट लावून भंगारमध्ये विक्री करण्यात येणार आहे. त्याकरीता इच्छुक खरेदीदार यांच्याकडून सिलबंद टेंडर मागविण्यात आले आहे.
वाहने परिक्षणाची तसेच अनामत रक्कम व नोंदणी तारीख 11 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी 10 ते दुपारी वाजेपर्यंत अनामत रक्कम भरावी लागेल. लिलाव 12 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते दुपारी 3 यावेळेत होईल.

*लिलावाच्या अटी व शर्ती :* वरीलप्रमाणे नमुद केलेल्या जंगम मालमत्तेची जशी आहे तशी जिथे आहे तिथे व ज्या स्थितीत आहे, तशी विक्री केली जाईल. लिलावाच्या वेळी व ठिकाणी लिलावाबाबत तपशिलवार अटी व शर्ती वाचुन  दाखविण्यात येतील. विक्री रकमेच्या 10 टक्के रक्कमेचा (अनामत) भरणा केल्यावर लिलाव बोली बोलुन झाल्यानंतर ज्यांचे नावाने सदर वाहनाचा लिलाव मंजुर होईल, त्या खरेदीदारास उर्वरित रक्कमचा भरणा त्वरीत लिलावाच्या ठिकाणीच भरणे बंधनकारक राहील. जर सदरचा भरणा त्वरीत मुदतीत केला नाही तर भरलेली 10 टक्के रक्कम कोणत्याही प्रकारची नोटीस न देता जप्त करण्यात येईल. जे खरेदीदार भंगार व्यावसायिक आहे (ज्याचे नावे भंगार व्यवसायाचे प्रमाणपत्र आहे.) तेथ विक्री रक्कमेच्या 10 टक्के रकमेचा (अनामत) भरणा करतील व फक्त त्याच खरेदीदारास विक्री बोली लिलावामध्ये प्रवेश मिळणार, त्याचप्रमाणे अनामत रक्कमेचा भरणा करतांना त्याचे प्रमाणपत्र ची आधारकार्डची झेरॉक्स प्रत्त सादर करावी लागेल

सदर लिलावाच्या बोली/ऑफर स्विकारणे न स्विकारणे लिलाव कायम करणे, पुढे ढकलणे किंवा रद्द करणे व इतर कोणतेही कारण न देता निर्णय घेणे, हे सर्व अधिकार ठाणेदार, पोलीस स्टेशन माजरी यांचे राहतील याची नोंद घ्यावी, असे ठाणेदार अमितकुमार पांडेय यांनी कळविले आहे.

००००००

***********************

Comments