प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*आदिवासी क्षेत्रातील वैद्यकीय सेवेबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद** मा.सां. कन्नमवार शास. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम*

*आदिवासी क्षेत्रातील वैद्यकीय सेवेबाबत विद्यार्थ्यांसोबत संवाद*

* मा.सां. कन्नमवार शास. वैद्यकीय महाविद्यालयात कार्यक्रम*

चंद्रपूर, दि. 2 : मेळघाट (जिल्हा अमरावती) येथील आदिवासी समुदायासाठी गेल्या वीस वर्षांपासून वैद्यकीय सेवेत कार्यरत असलेल्या 'महान' या संस्थेचे अध्यक्ष डॉ. आशिष सातव यांनी कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, चंद्रपूर येथे वैद्यकीय विद्यार्थ्यांसोबत संवाद साधला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. मिलिंद कांबळे, तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. मंगेश गुलवाडे, शरीर रचना (ॲनाटोमी) विभागाच्या प्रमुख डॉ. श्रुती मामीडवार, न्याय वैद्यक शास्त्र विभागाचे डॉ. शरद कुचेवार, जीव रसायनशास्त्र (बायो केमिस्ट्री ) विभागाच्या प्रमुख डॉ. प्रीती पापुलवार, कम्युनिटी मेडिसिन विभागाचे डॉ. हुमणे उपस्थित होते.

डॉ. सातव यांनी मेळघाट परिसरातील आरोग्य विषयक अडचणी, स्थानिक जनतेची आव्हाने व त्यांच्या 'महान' संस्थेच्या माध्यमातून गेल्या दोन दशकांपासून सुरू असलेल्या आरोग्य सेवा कार्याचा अनुभव विद्यार्थ्यांसमोर मांडला. त्यांनी केलेल्या विशेष वैद्यकीय अभ्यासावर आधारित राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय शोधनिबंधांची माहिती देखील दिली. येत्या डिसेंबर महिन्यात मेळघाट परिसरात आयोजित होणाऱ्या आरोग्य परिषदेसाठी येथील विद्यार्थ्यांनी व प्राध्यापकांनी सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

हा संवाद विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी व सामाजिक भान जागवणारा ठरला. ग्रामीण व दुर्गम भागातील आरोग्य सेवा क्षेत्रात काम करण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून विद्यार्थ्यांना मिळाली.

००००००


Comments