प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*‘साथी अभियानाच्या’ माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी आधारकार्ड शिबीर*

*‘साथी अभियानाच्या’ माध्यमातून शाळाबाह्य मुलांसाठी आधारकार्ड शिबीर*

चंद्रपूर, दि. 12 : निराश्रीत बालकांना ओळख आणि प्रतिष्ठा, त्यांची आधार नोंदणी, बालकांचे कायदेशीर सक्षमीकरण आणि शाळाबाह्य गरीब वस्तीत राहणाऱ्या बालकांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सावित्रीबाई फुले प्राथ व उच्च प्राथ शाळा, चंद्रपूर येथे आधार कार्ड शिबीर घेण्यात आले. 

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्याकडून महिला बालकल्याण विभाग, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, असेस टू जस्टिस फॉर चिल्ड्रन, जस्ट राईट फॉर चिल्ड्रेन  प्रोजेक्ट,  हृदय संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरणच्या प्रभारी सचिव ए.  झेड. खान तर प्रमुख अतिथी म्हणून महिला बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे,  जिल्हा परिवेक्षा अधिकारी मोरेश्वर झोडे, अजय साखरकर, मुख्याध्यापिका भारती पाजणकर, क्षेत्रीय अधिकारी शशिकांत मोकाशे उपस्थित होते.

शाळाबाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शैक्षणिक प्रवाहात आणण्यासाठी आधारकार्ड आवश्यक असल्याचे मत खान मॅडम यांनी व्यक्त केले. जिल्हा महिला बालविकास अधिकारी मिनाक्षी भस्मे यांनीही मार्गदर्शन करताना, शासन तुमच्या सदैव पाठीशी राहील. पालकांनी प्रशासनाला सहकार्य करून बालकांना शाळेत विशेष प्रवाहात आणण्याचा प्रयत्न करावा,  असे प्रतिपादन केले. यावेळी न्यायाधीश खान व महिला बल विकास अधिकारी भस्मे यांच्या समक्ष शाळेतील तक्रार पेटी उघडण्यात आली. 

निराधार मुलांचे कायदेशीर सक्षमीकरण करण्याचे काम " साथी अभियान " अंतर्गत सुरू आहे. यावेळी प्रकाश नगर, अष्टभुजा वॉर्डातील मुलांचे आधार कार्ड काढण्यात आले.  सदर साथी अभियानाच्या अंतर्गत जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील वस्त्यांमध्ये सामाजिक सेवक व कार्यकर्त्यांच्या माध्यमातून जवळपास 300 पेक्षा जास्त बालकांची नोंदणी करण्यात आली.

कार्यक्रमाचे संचालन  शशिकांत मोकाशे यांनी केले तर आभार मारोती दुर्गे यांनी मानले. कार्यक्रमाला संध्या तोगर, अजय पवार, मारोती कोसे, विवेक चिमूरकर, राणी मेश्राम, रश्मी भोयर शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व शाळा प्रशासनाचा विशेष सहभाग लाभला.

Comments