पत्रकार मनोज गाठले यांचे निधन


पत्रकार मनोज गाठले यांचे निधन

वरोरा : वरोरा तालुक्यातील चारगाव (धरण) बू. येथील रहिवासी मनोज अशोक गाठले (४० वर्ष) यांचे दि. २४ जुन ला पहाटे चंद्रपूर येथील खाजगी रुग्णालयात आजराशी झुंज देत निधन झाले.

मनोज गाठले हे आपल्या खुप वर्षांपासून पत्रकारितेतून समाजिक कार्याला हातभार लावणारे आणि न्याय मिळवून देणारे, विदर्भ प्रतिष्ठानचे संपादक होते. या पूर्वी दैनिक पब्लिक पोस्ट या वृत्तपत्राचे शेगाव प्रतिनिधी म्हणून काम केले तर सध्या दैनिक पुण्य-नगरीचे शेगाव प्रतिनिधी होते. तसेच व्हाईस ऑफ मिडीयाचे सदस्य होते. त्यांच्या मागे आई, वडील, पत्नी व दोन मुली असा आप्तपरिवार आहे. यांच्या वर काल दुपारी ५ वाजता चारगाव बू. येथील स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात आला.


व्हॉइस ऑफ मेडिया पत्रकार संघटनेतर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

Comments