* वरोरा भद्रावती येथील शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात*आमदार आणि खासदारांच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सदिच्छा भेटी.


*वरोरा भद्रावती येथील शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाची आनंददायी सुरुवात*

आमदार आणि खासदारांच्या विद्यार्थ्यांना व शिक्षकांना सदिच्छा भेटी

वरोरा 
चेतन लूतडे 

 जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात आज उत्साहात्मक वातावरणात झाली. विद्यार्थ्यांचे फुलांनी सजलेले स्वागत करण्यात आले, तर टाळ्यांच्या गजराने शाळेचे वातावरण आनंदी बनले. यावेळी शिक्षकांनी विद्यार्थ्यांना नवीन वर्षासाठी शुभेच्छा देत त्यांच्या शैक्षणिक आणि व्यक्तिमत्त्व विकासासाठी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील उत्साह आणि ज्ञानाच्या  आधारे हे वर्ष यशस्वी होईल, अशी अपेक्षा मान्यवरांनी व्यक्त कल्या.  

*आनंदवन ग्रामपंचायतीच्या पर्यावरणविषयक प्रयत्नांना सदिच्छा भेट**  
– 'माझी वसुंधरा' अभियानांतर्गत पर्यावरणासाठी झटणाऱ्या आनंदवन ग्रामपंचायतीला  सदिच्छा प्रतिनिधीमंडळाने भेट दिली. या गावाने पर्यावरणसुधारणा, स्वच्छता आणि पायाभूत सुविधांसाठी केलेल्या प्रयत्नांमुळे प्रथम क्रमांक पटकावला आहे. भेटीदरम्यान पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य सेवा आणि शैक्षणिक सुविधांचा आढावा घेण्यात आला. तसेच, खासदार प्रतिभा धानोरकर यांनी चंद्रपूर-आर्णी क्षेत्रातील शाळांना भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांच्या समस्यांवर चर्चा केली. ग्रामस्थांशी संवाद साधून गावाच्या विकासासाठी नव्या योजनांवर विचारविनिमय झाला.  

 *कर्मवीर विद्यालय, वरोरा येथे विद्यार्थ्यांना गणवेश व साहित्य वाटप*
 भद्रावती-वरोरा विधानसभा क्षेत्रातील कर्मवीर विद्यालय येथे नव्या शैक्षणिक वर्षाच्या शुभारंभाप्रसंगी विद्यार्थ्यांना गणवेश व शालेय साहित्य वाटप करण्यात आले. हा कार्यक्रम विधानसभा आमदार करण देवदळे यांच्या हस्ते पार पडला.  

या प्रसंगी आमदार करन देवतळे यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना म्हटले, **"युवा पिढीमध्ये शिक्षणाची आवड निर्माण व्हायला हवी, कारण तुम्हीच देशाचे भविष्य आहात. शिक्षणातूनच चांगले संस्कार घडतात. जेव्हा तुमचे नाव लौकिक होईल, तेव्हा तुमच्या शिक्षकांचा आणि आई-वडिलांचा आदर सतत ठेवला पाहिजे." असे मत त्यांनी व्यक्त केले. 

त्यांनी शाळेच्या नव्या वर्षाच्या सुरुवातीच्या निमित्ताने सर्व विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांना शुभेच्छा दिल्या. यावेळी शाळेचे प्राचार्य, शिक्षकवृंद आणि विद्यार्थी उपस्थित होते.  


Comments