वरोरा
प्रतिनिधी
एका महिलेने तालुक्यातील शेगाव येथील ताजणे हॉस्पिटलच्या डॉक्टर वर अश्लील प्रस्ताव आणि मानसिक छळ केल्याचा आरोप केला आहे. महिलेने शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवून डॉक्टर विरुद्ध कायदेशीर कारवाईची करण्याची मागणी केली आहे.
*घटनेचा तपशील:*
तक्रारीनुसार, महिला सध्या शेगाव येथे तिच्या पतीसोबत राहते आणि *ताजणे हॉस्पिटल*मध्ये स्टाफ म्हणून काम करते. ती वरोरा येथील *प्रख्यात कॉलेज*मध्ये १४वीच्या शिक्षण घेत आहे.तिच्या म्हणण्यानुसार, १९ जून २०२५ रोजी हॉस्पिटलमध्ये काम सुरू केल्यानंतर डॉ. ताजणे यांनी तिला सफाई करने, झाडांना पाणी घालणे, फर्निचर पुसणे यासह *"Sex By Me"* अशा अश्लील मागणीसह एक चिठ्ठी दिली. जेव्हा महिलेने हा प्रस्ताव नाकारला, तेव्हा डॉक्टरने तिला पुन्हा पुन्हा दबाव आणि फोनवर त्रास देत असल्याचा आरोप महिला कर्मचाऱ्यांनी केला आहे .
*पतीला कळवलं, पोलिसांकडे धाव घेतली:*
महिलेने ही घटना तिच्या पतीला कळवली आणि नंतर शेगाव पोलीस स्टेशनमध्ये तोंडी तक्रार नोंदवली. तिच्या तक्रारीनुसार, डॉ. ताजणे यांनी तिच्या नकारामुळे तिला कामावर येणे बंद केल्याचे सांगितले आणि फोनवर मानसिक त्रास देत *"शरीरसुखाची मागणी"* सुरू ठेवल्याचा आरोप केलेला आहे.
पोलिसांनी डॉ. ताजणे विरुद्ध भारतीय न्याय संहिता 2023 नूसार 75(1) नूसार गुन्हा शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत नोंद केला असून पुढील कारवाई पोलीस करीत आहे. तथापि, महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे ही बाब समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय बनली आहे.
Comments
Post a Comment