वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवाØ जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश

वाढत्या उन्हामुळे शाळा - महाविद्यालये सकाळच्या सत्रात 11 वाजेपर्यंतच ठेवा  जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी निर्गमित केले आदेश चंद्रपूर, दि. 19 : जिल्ह्यात सध्या वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. 11 मार्च 2026 रोजी आयोजित बैठकीत शिक्षणाधिकारी (प्राथमिक/माध्यमिक), जिल्हा परिषद यांना शाळा सकाळ सत्रात घेण्याबाबत निर्देश देण्यात आले होते. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात उन्हाचा तीव्र तडाखा जाणवत असून तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. दिवसेंदिवस उष्णतेची तीव्रता वाढत असल्याने शाळा व महाविद्यालयात जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. विशेषतः उष्माघात (सन स्ट्रोक) व इतर उष्णतेशी संबंधित आजारांचा धोका लक्षात घेता विद्यार्थ्यांची सुरक्षितता अत्यंत महत्त्वाची ठरत आहे. दुपारच्या कडक उन्हात शाळा सुटल्यानंतर विद्यार्थ्यांना घरी जाताना होणारा त्रास टाळण्यासाठी जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या (शासकीय, अनुदानित व खासगी) शाळा व महाविद्यालयांच्या वेळांमध्ये तात्पुरता बदल कर...

दीक्षा भूमी चंद्रपूर येथे बुद्ध जयंती उत्साहात साजरी

दीक्षा भूमी चंद्रपूर येथे  बुद्ध जयंती उत्साहात साजरी

चंद्रपूर

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल सोसायटी, चंद्रपूर संचालित डॉ. आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने  बुद्ध पौर्णिमेच्या निमित्ताने अत्यंत उत्साहात आणि श्रद्धाभावाने बुद्ध जयंती साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात मान. अरुण घोटेकर यांच्या हस्ते धम्मध्वजारोहणाने झाली, त्यानंतर दीक्षा भूमी येथे वंदना घेऊन कार्यक्रमाची धम्ममय सुरुवात केली.
मुख्य कार्यक्रम दीक्षा भूमी परिसरातील आंबेडकर भवनात पार पडला. यामध्ये कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे सहसचिव मान. कुणाल घोटेकर होते. अध्यक्षस्थानावरून बोलताना त्यांनी बुद्ध, धम्म व संघ हे त्रिसरण संपूर्ण विश्वाला शांती, अहिंसा व मानवतेचा संदेश देणारे असल्याचे सांगितले. ते म्हणाले, "बुद्धांचा धम्म हा केवळ धर्म नसून मानवतेचा मूलमंत्र आहे." कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संस्थेचे उपाध्यक्ष मान. अशोक घोटेकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना सांगितले की, "मानवमुक्तीचा एकमेव मार्ग म्हणजे तथागत बुद्धांच्या शिकवणींवर चालणे. त्यांच्या विचारांशिवाय समाजाचा खरा विकास शक्य नाही." या कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित डॉ. स्निग्धा सदाफळे  यांनी 'बुद्ध म्हणजेच भारतीय इतिहासातील लोकशाही, समता आणि स्वातंत्र्याचा अग्निस्त्रोत' असल्याचे विचार मांडले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश दहेगांवकर यांनी बुद्धांच्या विचारांचे आजच्या युगातील महत्त्व स्पष्ट करत विद्यार्थ्यांनी धम्मतत्त्वांच्या आधारे जीवन घडवावे, असे आवाहन केले.  सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. शितल रामटेके यांनी केले, तर आभार प्रदर्शन प्रा. शिल्पा  सदाफाळे यांनी केले. कार्यक्रमास महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. संपूर्ण परिसर धम्ममय वातावरणाने भारावून गेला होता.

Comments