खेमजई येथे बायोचार निर्मितीला सुरुवात

खेमजई  येथे बायोचार  निर्मितीला सुरुवात 

20एप्रिल2026:- वरोरा तालुक्यातील खेमजई येथे अंबुजा फाउंडेशन व कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनी चिनोरा यांच्या संयुक्त विद्यमाने बायोचार निर्मितीला आजपासून सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाचे उद्घाटन कांचनी फार्मर प्रोड्युसर कंपनीचे अध्यक्ष यशवंत सायरे यांच्या हस्ते करण्यात आले.
 अंबुजा हवामान बदल प्रकल्पाचे समन्वयक किशोर कोरे यांनी या प्रकल्पाबद्दल मार्गदर्शन करून बायोचार  निर्मितीचे प्रात्यक्षिक करून दाखवले.तसेच बायोचार निर्मिती करताना घ्यावयाची काळजी याबाबत सविस्तर असे मार्गदर्शन केले. मंडळ कृषी अधिकारी विजय काळे यांनी बायोचार वापरण्याचे शेतकऱ्यांना होणारे फायदे याबद्दल मार्गदर्शन केले .
 यावेळी कांचनी फार्मर प्रोडूसर कंपनीचे संचालक बळीरामजी डोंगरकर, अंबुजा फाउंडेशन तालुका समन्वयक विश्वास गुल्हाने, ग्राम संघाचे अध्यक्ष वंदना साळवे, उपसरपंच चंद्राहास मोरे, प्रमोद गायकवाड रमेश बावने, ग्रामपंचायत सचिव मेघश्याम येंचलवार, विनायक बावणे इत्यादी उपस्थित होते.या प्रकल्पाला नायब तहसीलदार गिरीष बोर्डे यांनी भेट देऊन माहिती जाणून घेतली.ज्या शेतकऱ्यांनी  पऱ्हाट्या दिल्या त्यांना प्रकल्पातुन तयार होणारा बायोचार व गांडूळ खत मिश्रण करून शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.
 कार्यक्रमाचे प्रास्ताविक विश्वास गुल्हाने तर संचालन रमेश चौधरी यांनी केले.कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता प्रक्षेत्र अधिकारी प्रतीक्षा चहांदकर व प्रतीक हरणे, प्रकल्प समन्वयक विनायक बावणे,राजू श्रीरामे यांनी परिश्रम घेतले.

Comments