प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये आचार्य पदवी प्राप्त

वरोरा, दिनांक 15 मार्च २०२६ प्रा.मनीषा बारसागडे (पाटील) यांना अर्थशास्त्र विषयांमध्ये  आचार्य पदवी प्राप्त वरोरा : मनीषा दर्शन बारसागडे यांनी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास आणि प्रचंड गुणवत्तेच्या बळावर गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथून अर्थशास्त्र विषयात पीएच.डी पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी "चंद्रपूर जिल्ह्यातील संजय गांधी निराधार योजनेचे आर्थिक व सामाजिक अध्ययन'"(सत्र २०१०-११ ते २०२०-२१) या विषयावर संशोधन केले. त्यांचे मार्गदर्शक प्रोफेसर डॉ. राजेश पी कांबळे, अर्थशास्त्र विभाग प्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, ब्रह्मपुरी यांच्या मार्गदर्शनाखाली हे संशोधन पूर्ण केले. मनीषा नरेंद्र पाटील  हे  रमाई परिसर, बोर्डा तालुका वरोरा जिल्हा चंद्रपूर येथील रहिवासी असून ते मूळचे चिमूर तालुक्यातील किटाडी (तुकूम) या गावातील असून त्यांचे माहेर पवनी तालुक्यातील बेटाळा( वाही)हे असून सध्या आनंद निकेतन महाविद्यालयांमध्ये तासिका तत्त्वावर कार्यरत आहेत. या यशस्वी संशोधनाबद्दल त्यांचे पती प्रोफेसर डॉ. नरेंद्र केशव पाटील, आनंद निकेतन महाविद्...

*ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी झालेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार**आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास**आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्य अभियंत्यांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा*

*ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी झालेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार*

*आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*

*आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांची मुख्य अभियंत्यांसमवेत महत्त्वपूर्ण चर्चा*

*चंद्रपूर, दि. 4 : ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक सुविधा आणि प्रस्तावित प्रकल्पांवर महत्त्वपूर्ण बैठक चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राचे मुख्य अभियंता विजय राठोड यांच्यासमवेत राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्य व्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी हिराई विश्रामगृह येथे घेतली. यावेळी परिसरातील नागरिकांसाठी मूलभूत सुविधा, पर्यावरण संवर्धन, सांस्कृतिक आणि क्रीडाविषयक प्रकल्प राबवण्याबाबत सविस्तर चर्चा करुन ठोस कार्यवाही करण्याचे श्री. मुनगंटीवार यांनी सूचित केले.ऊर्जानगरच्या सर्वांगीण विकासासाठी केलेली सर्वसमावेशक चर्चा निर्णायक ठरणार, असा विश्वास आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*

याबैठकीला मुख्य अभियंता विजय राठोड,रामपाल सिंग,अनिल डोंगरे, हनुमान काकडे आदिंची उपस्थिती होती.

आरओ मशीन त्वरित दुरुस्तीसाठी सीएसआर निधीतून आवश्यक आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यात यावे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाला विद्युत कनेक्शन देण्याची गरजही अधोरेखित करण्यात आली. 

ऊर्जानगर वसाहतीच्या नूतनीकरणाची आवश्यकता लक्षात घेऊन वसाहतीच्या सुधारणेसाठी नियोजनबद्ध कामे हाती घ्यावी. नाट्यगृहाच्या उभारणीसाठी 2 एकर जागा त्वरित उपलब्ध करून द्यावी. तसेच परिसरातील युवकांसाठी अत्याधुनिक जिम उभारण्यासाठी प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना दिल्या. यासोबतच, पर्यावरण संवर्धनासाठी 2 लाख कडुलिंबाची झाडे ऊर्जानगर परिसरात लावण्याबाबत योग्य कार्यवाही करण्याचे निर्देशही संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.या भेटीत झालेली ही सर्वसमावेशक चर्चा ऊर्जानगर परिसराच्या सर्वांगीण विकासाला चालना देणारी ठरणार आहे.


Comments