वरोरा येथे हायटेन्शन तारांवर कोसळला विद्युत खांब; अक्षय सोनटक्के यांच्या तत्परतेने टळला अनर्थ

वरोरा येथे हायटेन्शन तारांवर कोसळला विद्युत खांब; अक्षय सोनटक्के यांच्या तत्परतेने टळला अनर्थ बातमी: चेतन लूतडे  वरोरा – काल रात्री बोर्डा चौक, वरोरा येथे एक धोकादायक घटना घडली. महामार्गावरील विद्युत खांब अचानक कोसळून थेट महावितरण कंपनीच्या हायटेन्शन तारांवर आदळला. या भीषण प्रसंगामुळे महामार्गावरून ये-जा करणाऱ्या वाहनांचा मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. मात्र, या गंभीर परिस्थितीत अक्षय सोनटक्के यांनी प्रसंगावधान व धाडस दाखवत तत्काळ पोलीस स्टेशन वरोरा, MSEB (वीज वितरण विभाग) आणि टोल यंत्रणेशी संपर्क साधला. त्यांच्या या त्वरित कारवाईमुळे एक मोठा अनर्थ टळला. अक्षय सोनटक्के यांचे हे कर्तव्यदक्षतेचे कार्य अत्यंत कौतुकास्पद असून, त्यांनी केलेल्या सूज्ञतेने अनेक जीव वाचले. प्रशासनाकडूनही त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर* *आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया**वाघमारे कुटुंबांने मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार*

*आ. सुधीर मुनगंटीवार यांच्यामुळे आराध्याच्या कानाला लाभले आनंदाचे सूर* 

*आ. मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने यशस्वी कॉक्लियर इम्प्लांट शस्त्रक्रिया*

*वाघमारे कुटुंबांने मानले आ. मुनगंटीवार यांचे आभार*

*चंद्रपूर, दि. १३ – राज्याचे माजी वने सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकारामुळे एका कुटुंबातील लाडक्या लेकीच्या कानांना आनंदाचे सूर लाभले. सामाजिक भावनेतून निःस्वार्थ कार्य करणारे आ. मुनगंटीवार यांनी पुन्हा एकदा आनंदाची पेरणी करण्याचे काम केले आहे. निमित्त ठरले वाघमारे कुटुंबाचे. चंद्रपूर शहरातील नेहरू नगर वार्डात राहणाऱ्या वाघमारे कुटुंबियांसाठी १२ एप्रिल २०२५ हा दिवस आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला. त्यांची मुलगी आराध्या मंगेश वाघमारे हिची कॉक्लियर इम्प्लांट ही अत्यंत महत्त्वाची आणि क्लिष्ट शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडली. आ. श्री. मुनगंटीवार यांनी पुढाकार घेतला नसता तर आम्हाला आज हा आनंद अनुभवता आला नसता, या शब्दांत वाघमारे कुटुंबाने आभार व्यक्त केले आहेत.*

आराध्या अवघी १ वर्षांची असताना दोन्ही कानांना पूर्णतः बहिरेपणा असल्याचे निदान झाले होते. त्यामुळे वाघमारे कुटुंब चिंतेत होते. प्राथमिक उपचारांमध्ये काहीच यश न मिळाल्यानंतर त्यांनी आ. श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी अत्यंत संवेदनशीलतेने या प्रकरणाकडे लक्ष दिले. सागर खडसे यांना वाघमारे कुटुंबाला सहकार्य करण्याचे निर्देश दिले.

आ. श्री. मुनगंटीवार यांनी वेळोवेळी योग्य मदत व पाठबळ दिल्यामुळे टाटा ट्रस्ट यांच्या सहकार्याने नागपूर येथील ऑरेंज सिटी रुग्णालयात इएनटी सर्जन डॉ. श्वेता लोहिया यांच्या मार्गदर्शनात आराध्याचे ऑपरेशन पार पडले. आज आराध्या ऐकू शकते, तिच्या चेहऱ्यावरचा आनंद आणि तिच्या कुटुंबियांच्या डोळ्यांतील अश्रू या यशोगाथेची साक्ष देतात. वाघमारे कुटुंबाने सुधीर मुनगंटीवार यांचे विशेष आभार मानले आहेत. 

मंगेश वाघमारे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना आ. श्री. मुनगंटीवार यांना देवदूत म्हटले आहे. ‘आमच्यासाठी आ.सुधीर मुनगंटीवार देवदूत ठरले आहेत. त्यांच्या मदतीशिवाय हे शक्य झाले नसते. आरोग्य सेवेत मानवी दृष्टीकोन व संवेदनशील नेतृत्व किती महत्त्वाचे असते याचे हे उत्तम उदाहरण आहे. प्रत्यक्ष भेट घेऊन आमदार सुधीर मुनगंटीवार यांचे आभार व्यक्त करणार आहो,’ अश्या भावना मंगेश वाघमारे यांनी व्यक्त केल्या.
************************
.           Happy birthday bhau 

Comments