संबंधित विभागाचे दुर्लक्ष
वरोरा
चेतन लूतडे
वरोरा तालुक्यातील पिजदूरा- भटाळा रस्त्यावरील फुलाला भले मोठे भगदाड पडले आहे. मागील दोन वर्षांपासून पिजदुरा- भटाळा रस्त्यावरील नाल्यावर बांधकाम केलेल्या पुलाला भगदाड पडले आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच जिल्हा परिषद बांधकाम विभाग वरोरा यांना लेखी पत्र दिले मात्र सदर रस्त्याला नंबर नसल्यामुळे संबंधित विभागाने हा मार्ग आमच्याकडे येत नसल्यामुळे तक्रार करताना लेखी पत्र दिली आहे. त्यामुळे आज पर्यंत भगदाड पडलेल्या पुलाचे दुरुस्ती करण्यात आलेले नाही, हा मार्ग दोन्हीही पुरातन विभागाशी संलग्न असलेल्या गावाशी जोडलेल्या आहे .तसेच या मार्गाने भटाळा -आसाळा पिजदूरा -पाचगाव येथील शेतकरी शेतात जाण्यासाठी या मार्गाचा वापर करतात, त्यामुळे या भगदाड पडलेल्या रस्त्यावर कधी पण अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गाचे पुलावरील बांधकाम लवकरात लवकर करण्यात यावे, तसेच नादुरुस्त पुलामुळे कुणाचा अपघात झाल्यास सदर विभागावर मनुष्य व त्याचा गुन्हा दाखल करण्यात येईल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते किशोर डुकरे यांनी दिला आहे. यासंदर्भातील निवेदन व प्रतिलिपी उपविभागीय अधिकारी वरोरा , कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग वरोरा, जिल्हा परिषद बांधकाम विभाग शाखा वरोरा वरिष्ठ अभियंत यांना देण्यात आले आहे.
--------------------
*काँग्रेसचे तडफदार नेते, सामाजिक कार्यात कायम अग्रेसर असलेले, खा. प्रतिभाताई यांना सावली साथ देणारे मा. प्रवीणभाऊ काकडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा...*
Comments
Post a Comment