महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक– मा. आमदार करण संजय देवतळे

महाराष्ट्र राज्याचा अर्थसंकल्प 2026–27 : विकासाभिमुख व सर्वसमावेशक – मा. आमदार करण संजय देवतळे महाराष्ट्र राज्याचा सन 2026–27 चा अर्थसंकल्प हा राज्याच्या सर्वांगीण आणि संतुलित विकासाला गती देणारा, दूरदृष्टीचा व लोककल्याणाचा अर्थसंकल्प असल्याची प्रतिक्रिया वरोरा-भद्रावती विधानसभा मतदारसंघाचे मा. आमदार श्री. करण संजय देवतळे यांनी व्यक्त केली  या अर्थसंकल्पामध्ये राज्यातील शेतकरी, महिला, युवक, कामगार, तसेच ग्रामीण व शहरी भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा विचार करण्यात आला असून राज्याच्या पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. शेती व शेतकरी यांच्या सक्षमीकरणासाठी शासनाने कर्जमाफी योजना जाहीर केली असून  कर्ज माफी समितीने केलेल्या शिफारशीनुसार दि. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत पिक कर्ज थकीत असलेल्या शेतकऱ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेअंतर्गत 2 लाख रुपयापर्यंतची कर्जमाफी तसेच नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपये प्रोत्साहन लाभ देण्यात येणार आहे.  महिला सक्षमीकरण, शिक्षण, आरोग्य, सामाजिक सुरक्षा व रोजगा...

आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास ,रोजगार व उद्योग माहिती व मार्गदर्शन बॅचेस शुभारंभ

*आदिवासी उमेदवारांकरीता स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन बॅचचा शुभारंभ*

आदिवासी उमेदवाराकरिता कौशल्य विकास ,रोजगार व उद्योग माहिती व मार्गदर्शन बॅचेस शुभारंभ

चंद्रपूर, दि. 2 एप्रिल :  आदिवासी उमेदवारांकरीता कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता माहिती व मार्गदर्शन केंद्र येथे सन 2025-26 मधील पहिल्या बॅचचा शुभारंभ उपजिल्हाधिकारी (भुसंपादन) संजय पवार यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी प्रशिक्षण केंद्राच्या केंद्रप्रमुख तथा कौशल्य विकास व मार्गदर्शन अधिकारी भाग्यश्री  वाघमारे यांनी सन्मानचिन्ह योजनादर्शिका व माहिती पुस्तिका देऊन उपजिल्हाधिकारी श्री. पवार यांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना श्री. पवार म्हणाले, उमेदवारांनी अभ्यासाची तीव्र इच्छा, निश्चीत ध्येय, प्रयत्नात सातत्य, कठीण परिश्रम, परिस्थितीची जाणीव ठेवून वाटचाल करावी. तसेच आपले ध्येय साध्य करावे. प्रास्ताविकात श्रीमती वाघमारे यांनी कार्यालयाची माहिती, प्रशिक्षणाचा उद्देश तथा स्पर्धा परिक्षाबाबतचे महत्व याबाबत माहिती दिली

कार्यक्रमाचे संचालन व आभार कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी विजय गराटे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्वांनी नवीन बॅचच्या उमेदवारांचे स्वागत करून भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

००००००

Comments