वरोरा, दि. २३ (प्रतिनिधी) :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा, चिमुर, राजुरा या विधानसभेकरिता जिल्हा महिला संघटकपदी वर्षा राजेश ठाकरे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवा नेते आमदार आदित्य ठाकरे, शिवसेना नेते संजय राऊत, आमदार भास्कर जाधव, माजी खासदार विनायक राऊत, चंद्रपूर-आर्णी लोकसभा क्षेत्राचे संपर्क प्रमुख आमदार संजय देरकर, माजी महापौर किशोरीताई पेडणेकर, जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम, रंजनाताई नेवाळकर, जिल्हा संपर्क प्रमुख महिला आघाडी सुषमाताई साबळे, युवासेना हर्षल काकडे यांच्या मार्गदर्शनात सदर नियुक्ती करण्यात आलेली आहे.
शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे वरोरा, राजुरा व चिमूर विधानसभा क्षेत्राचे जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या कार्याने दिवसेंदिवस पक्षाचे संघटन मजबूत होत असून पक्षाचे जनहितार्थ कार्य वाढीस लागले आहे. पक्षात इनकमिंग वाढली असुन अनेक प्रस्थापित व नवीन चेहरे पक्षात प्रवेश घेत आहे. सोबतच पक्षातील सक्रीय पदाधिकारी व कार्यकर्ते यांना पदांच्या स्वरूपात बहुमान मिळत आहे.
वर्षा ठाकरे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक व राजकीय क्षेत्रात सक्रिय आहेत. त्यांनी राजकारणात विविध पदे भूषविली आहेत. वर्षाताई ठाकरे यांनी शिवसेना महिला आघाडीच्या भद्रावती तालुका अध्यक्ष, कुचना ग्राम पंचायत सरपंच, संजय गांधी निराधार योजना समिती सदस्य, भद्रावती तालुका नागरी सह. पत संस्थेच्या संचालक, आदी पदे भूषविली आहेत. त्यांनी पाटाळा पुलाकरीता आंदोलन केले आहे. त्यावेळी पोलीस प्रशासनाने विविध कलमा अंतर्गत गुन्हा नोंद केला होता. मात्र प्रशासनाने आंदोलनाची दखल घेत पुलाची दुरुस्ती करुन नागरीकांकरीता सुरक्षा व्यवस्था बहाल केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची नियुक्ती झालेली आहे.
वर्षा राजेश ठाकरे यांच्या जिल्हा महिला संघटकपदाच्या नियुक्ती साठी सर्वत्र त्यांचे अभिनंदन होत आहे. जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे, पूर्व विदर्भ सचिव नीलेश बेलखेडे, संदीप रियाल (पटेल) युवासेना महाराष्ट्र राज्य विस्तारक,मनीष जेठानी युवासेना विस्तारक, मायाताई नारळे उपजिल्हा संघटीका वरोरा विधानसभा,वरोरा तालुका महिला आघाडी प्रमुख सरला मालोकर, आशाताई ताजने, तालुकाप्रमुख नंदू पढाल,कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती भास्कर ताजने, खेमराज कुरेकर, रोहन कुटेमाटे, ज्ञानेश्वर डुकरे माजी नगराध्यक्ष, नितीन पिपरे, आश्लेषा जीवतोडे उपसभापती बाजार समिती भद्रावती , प्रमोद वाघ,, राजुरा तालुका प्रमुख संदीप वैरागडे,कोरपणा तालुका प्रमुख डॉ प्रकाश खनके,गोडपिपरी तालुका प्रमुख सुरज माडूरवार, जिवती तालुका प्रमुख रमेश जाधव, भद्रावती शहर प्रमुख घनश्याम आस्वले, माया टेकाम भद्रावती शहर संघटीका , शीला आगलावे उपतालुका महिला आघाडी , भावना खोब्रागडे भद्रावती महिला आघाडी समन्वयक,माजी नगरसेवक पंकज नाशिककर, नंदू टेमुर्डे, अभिजीत पावडे, शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे सर्व विंगचे पदाधिकारी आदींनी अभिनंदन केले आहे.
Comments
Post a Comment