*उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश**पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम*

*उद्धव साहेब ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन  शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात प्रवेश*

*पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत झाला पक्षप्रवेशाचा कार्यक्रम*

*या प्रसंगी शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी शिवसैनिकांना दिलेल्या शपथपत्राचे विमोचन*

फक्त बातमी 

शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी दिलेल्या ८० टक्के समाजकारण आणि २० टक्के राजकारण ह्या मूलमंत्राचा आदर्श समोर ठेवून पक्षप्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यातून प्रेरणा घेत तसेच युवासेना प्रमुख माजी मंत्री आ. आदित्य ठाकरे, शिवसेना नेते खा. संजय राऊत, शिवसेना नेते तथा सचिव माजी खा. विनायक राऊत, पुर्व विदर्भ संपर्क प्रमुख आ. भास्कर जाधव, आमदार मिलिंद नार्वेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे (वरोरा, राजुरा, चिमूर विधानसभा क्षेत्र ), वरोरा विधानसभा संपर्क प्रमुख रितेश रहाटे व राजुरा विधानसभा प्रमुख अनिल कदम यांचे उपस्थितीत वरोरा नगरपालिकेचे माजी नगरसेवक पंकज गणेशराव नाशिककर, व मोहबाळाचे सरपंच नंदुभाऊ टेमुर्डे यांचा पक्ष प्रवेश झाला. 
या प्रसंगी शिवसेना प्रमुख हिंदू हृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्र राज्याच्या हितासाठी शिवसैनिकांना जी शपथ घालून दिली होती त्या शपथपत्राचे विमोचन करण्यात आले.

जिल्ह्यात शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातर्फे  चंद्रपुर जिल्हा संपर्क प्रमुख प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनात व चंद्रपूर शिवसेना जिल्हाप्रमुख रवींद्र शिंदे यांच्या नेतृवात जिल्ह्यात सामाजिक व राजकीय कार्य सतत सुरु आहे. या कार्याला प्रेरित होऊन अनेकजण शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्षात अनेक कार्यकर्त्यांसह सतत प्रवेश घेत आहेत.

आज दि. १७ एप्रिल रोजी शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्या समक्ष मुंबई येथे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम संपन्न झाला. या दोघांचेही शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षात स्वागत करण्यात आले आहे.
      
पक्षात प्रवेश घेणाऱ्या पंकज नाशिककर, व नंदुभाऊ टेमुर्डे यांचे तालुका प्रमुख नरेंद्र पढाल, युवासेना विस्तारक मनीष जेठानी, सुनील मोरे, लक्ष्मण ठेगणे, मारोती भाऊ नागपुरे, वैभव डहाणे, संजय उमरे, महेश राऊत, प्रमोद कातोरे, सोहेल पठाण तथा चंद्रपूर जिल्ह्यातील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) कुटूंबाकडून अभिनंदन करण्यात आले.

Comments