पांढरकवड्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक विकास अधिक वेगाने होईल* – *आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*

*पांढरकवड्याचा धार्मिक आणि सांस्कृतिक विकास अधिक वेगाने होईल*

 – *आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला विश्वास*

*पंचमुखी हनुमान मंदिर येथे नव्याने उभारलेल्या १.५ कोटींच्या भक्तनिवासाचे लोकार्पण*

*चंद्रपूर, दि. १२: गतवर्षी पंचमुखी देवस्थान हनुमान मंदिर, पांढरकवडा येथे दर्शनासाठी भेट दिली असता, मंदिराच्या विश्वस्त मंडळाने भक्त निवास उभारण्याची मागणी केली होती. हे तीर्थक्षेत्र ‘क’ वर्गात असल्यामुळे निधी मंजूर करणे कठीण होते. मात्र, विशेष बाब म्हणून १ कोटी ५० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. या निधीतून भक्त निवासाचे काम यशस्वीरित्या पूर्ण झाले असून, त्यामुळे पांढरकवड्याचा धार्मिक व सांस्कृतिक विकास अधिक वेगाने होईल, असा विश्वास राज्याचे माजी वने, सांस्कृतिक कार्य व मत्स्यव्यवसाय मंत्री आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.*

नवीन भक्त निवासाचे लोकार्पण आमदार श्री. सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते पार पडले. या कार्यक्रमाला डॉ. मंगेश गुलवाडे, विवेक बोढे, ब्रिजभूषण पाझारे, अनिल डोंगरे, नम्रता ठेमस्कर, विक्की लाडसे, लक्ष्मण सादलावार आदी मान्यवर उपस्थित होते.

या प्रसंगी आमदार मुनगंटीवार म्हणाले, श्री हनुमानने प्रत्येक संकटावर मात करण्याची शक्ती भक्तांना द्यावी. यापुढे मंदिर परिसरातील उर्वरित कामांसाठीही निधी उपलब्ध करून दिला जाईल. त्यासाठी शिल्लक कामांची यादी तयार करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले.

“भक्त निवासामुळे पंचमुखी हनुमान मंदिरात येणाऱ्या भाविकांना अधिक सोयीसुविधा मिळणार असून, त्यामुळे पांढरकवड्याचा धार्मिक व सांस्कृतिक विकास अधिक गतीने घडेल,” असा पुनरुच्चार आमदार मुनगंटीवार यांनी केला.

राज्यातील विविध तीर्थक्षेत्रांच्या विकासाचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, मी वनमंत्री असताना श्रीक्षेत्र भीमाशंकर, औंढा नागनाथ येथे अनेक सुविधा निर्माण केल्या. शिखर शिंगणापूर येथे १२०० बेलाची झाडे लावण्यात आली आहेत. पंढरपूर येथे तुळशी वृंदावन विकसित करण्यात आले.  तसेच तेथे विविध प्रजातींची तुळस लावण्यात आली आहे. पंढरपूरमध्ये मल्टिप्लेक्स संकीर्तन सभागृहाचे बांधकाम पूर्ण झाले असून, ते कीर्तन, प्रवचन व प्रबोधनासाठी उपयुक्त ठरणार आहे.

Comments