वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

स्थानिकांना रोजगार द्या; ट्रक चालकांना पुन्हा सेवेत घ्या – युवासेनेची आरो माइनिंगला मागणी*

*स्थानिकांना रोजगार द्या; ट्रक चालकांना पुन्हा सेवेत घ्या – युवासेनेची आरो माइनिंगला मागणी*

भद्रावती : तालुक्यातील स्थानिकांना रोजगार न मिळणे आणि ट्रक चालकांना कामावरून कमी करण्याचा निर्णय अन्यायकारक असून, तत्काळ योग्य तो निर्णय न घेतल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा थेट इशारा आलेख रमेश रट्टे यांच्या नेतृत्वात युवासेना भद्रावती-वरोराच्या वतीने आरो माइनिंग व्यवस्थापनाला देण्यात आला. या मागणीसाठी कंपनीच्या अधिकाऱ्यांना भेटून  निवेदन देण्यात आले.

भद्रावती तालुक्यातील तरुणांना कंपनीत रोजगाराच्या संधी मिळाव्यात आणि जे कामगार आधीच कार्यरत आहेत, त्यांना कायमस्वरूपी नोकरी मिळावी, ही स्थानिकांची प्रमुख मागणी आहे. मात्र, या मागण्यांकडे दुर्लक्ष होत असल्याने आलेख रमेश रट्टे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या  कार्यकर्त्यांनी हा मुद्दा उचलून धरला.

आरो माइनिंगमध्ये काम करत असलेल्या काही ट्रक चालकांना अचानक सेवेतून कमी करण्यात आले, हा प्रकार पूर्णपणे अन्यायकारक असून, त्यांना त्वरित पुनर्नियुक्ती द्यावी, अन्यथा संघर्ष अटळ आहे, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला.
या निवेदनाच्या वेळी 
विधानसभा समन्वयक मुनेश्वर बदखल, अमोल पारोदे, वेदांत गजबंदे यांची उपस्थिती होती. कंपनीच्या अधिकाऱ्यांनी योग्य कार्यवाहीचे आश्वासन दिले असले, तरी मागण्या पूर्ण झाल्या नाहीत, तर मोठ्या प्रमाणावर आंदोलन छेडले जाईल, असा ठाम इशारा यावेळी देण्यात आला.

*संघर्षाशिवाय न्याय नाही – आलेख  रट्टे*
यावेळी बोलताना आलेख रमेश रट्टे म्हणाले, "स्थानिक तरुणांना रोजगार द्यायला हवा, त्यांचा हक्क हिरावला जाणार नाही! जर कंपनीने योग्य निर्णय घेतला नाही, तर रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागेल. आम्ही शांत बसणार नाही.

Comments