वरोरा : वरोरा शहरातील जिजामाता वार्ड, बावणे लेआऊट येथील ३२ वर्षीय गेल्या दोन महिन्यापासून बेपत्ता असल्याची तक्रार वडील यांनी वरोरा पोलिसात केली आहे. मात्र त्याचा अद्याप पत्ता लागलेला नाही. सागर मत्ते असे बेपत्ता असलेल्या युवकाचे नाव असून तो मारडा रोडवरील एका खाजगी कंपनीत दि. २३ जानेवारी २०२५ रोजी काम करायसाठी गेला होता मात्र सायंकाळी परत आलाच नाही. घरच्या मंडळीनी त्याचा शोध घेतला मात्र त्यांचा कुठेच पत्ता लागला नाही. आज जवळपास दोन महिने लोटून गेले. तसेच त्यांचा मोबाईल क्रमांक बंद असल्याचे समजते. यासंबधी वडीलांनी वरोरा पोलिसात तक्रार केली असून संबधीत युवक आढळल्यास वरोरा पोलिसांशी संपर्क साधावा असे एका पत्रकातून कळविले आहे.
Comments
Post a Comment