गजानन नगरी वार्डातून बुलेट चोरीला.
मोपेट दुचाकीवरून आलेल्या तीन चोरट्यांचा प्रताप.
वरोरा
चेतन लूतडे
दुचाकी वाहन चोरीच्या घटना वरोरा शहरात मोठ्या प्रमाणात घडत असून बाहेरील गावातून संध्याकाळला तीन-चार युवक येऊन दुचाकी चोरून नेण्याचा प्रताप मोठ्या प्रमाणात होत आहे.
वरोर शहरातील गजानन नगरी येथील सालवटकर यांच्या घरी गेटच्या आत बुलेट क्रमांक Mh34-BN2137 ठेवलेली चोरून नेण्यात आली. याच ठिकाणी बऱ्याच किरायदारांच्या पाच-सहा दुचाकी ठेवलेल्या होत्या. मात्र महागाची गाडी समजून बुलेटला या चोरट्याने चोरून नेली आहे.
11/3/2025 रोजी 3.30 च्या पहाटेच्या सुमारास तीन युवकांनी दुचाकी मोपेड वर येऊन घराच्या आतील ठेवलेली बुलेट लॉक तोडून चोरून नेली. सकाळी हा सगळा प्रकार बुलेट मालकाच्या निदर्शनास आला.
या सगळ्या घटनेवरून अक्षय राऊत यांनी पोलीस स्टेशन वरोरा येथे तक्रार दाखल केली असून पोलीस या प्रकरणाचा शोध घेत आहे.
Mh34-BN2137 या नंबरची बुलेट किंवा विना नंबर प्लेट संशयित असलेली बुलेट कुठेही दिसल्यास पोलिसांना किंवा अक्षय राऊत यांना संपर्क करावा अशी विनंती केली आहे.
यासंदर्भात सीसीटीव्ही फुटेज गोळा केले असून तीन युवक शहरामध्ये मोपेड दुचाकी वाहनावर पांढरे लाईट सुरु करून जेणेकरून नंबर प्लेट सीसीटीव्हीत दिसणार नाहीत अशा संशयित युवकांना सीसीटीव्हीत फिरताना दिसले आहे. चोरलेली बुलेट आनंदवन चौक येथून चंद्रपूरच्या दिशेने गेल्याचे निदर्शनास आले आहे. या संबंधित चोरट्यांचे चेहरे लक्षात घेऊन त्यांना लवकरच गजाआड टाकतील अशी आशा पोलिसांनी व्यक्त केली आहे.
Comments
Post a Comment