वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*महिला दिनी भद्रावती येथे महिलांनी घेतला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश*

*महिला दिनी भद्रावती येथे महिलांनी घेतला शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षात पक्षप्रवेश* 

फक्त बातमी , वरोरा 

शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्ष प्रमुख आदरणीय उध्दवजी ठाकरे यांच्या कार्यास प्रेरीत होवून, पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख  तथा  विरोधीपक्ष नेते भास्कर जाधव साहेब, चंद्रपूर-आर्णी लोकसभा संपर्कप्रमुख आमदार संजय देरकर साहेब, चंद्रपूर जिल्हा संपर्कप्रमुख प्रशांत दादा कदम, चंद्रपूर जिल्हा महिला सर्पक प्रमुख सुषमाताई साबळे यांचे मार्गदर्शनात तसेच तालुकाप्रमुख आशाताई ताजने यांचे नेतृत्वात चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत 75-वरोरा-भद्रावती विधानसभा क्षेत्रातील महिलानी जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत सौ. रंजना नारायण खोंड, सौ. सविता नामदेव खाडे, सौ. ज्योती विष्णु सरोदे, सौ. ममता पवन भांबेवार, सौ. वर्षाताई साबळे, प्राध्यापिका उज्वलाताई जयंत वानखेडे, उषाताई आमटे, योगीताताई गोहाणे, विद्याताई मोघे, संगीताताई गोविंदा काळे तसेच सौ. नीताताई विनोद भेंडे आदीनी पक्षात प्रवेश घेतला. 
याप्रसंगी चंद्रपूर जिल्हा प्रमुख रवींद्र शिंदे यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) परिवारा तर्फे सर्वांचे स्वागत करीत शुभेच्छा दिल्या.

Comments