बनावट कागदपत्रे वापरून जमीन विकून 21 लाखांची फसवणूकवरोरा येथील आंबेकर (गाढवे) दलालाचा कारनामा.

वरोरा येथील देविदास आंबेकार (गढवे)  दलालाचा कारनामा. डाहुले व दानव यांचा प्रताप

सरकारी जमीन विकून 21 लाख रुपयांची फसवणूक.

बनावट कागदपत्रे कशी तयार केली याचा तपास सुरू.

■ मारेगाव, (सं.). भूदान यज्ञ मंडळ नागपूर यांच्या मालकीच्या शेतजमिनीची बनावट कागदपत्रे तयार करून नागपुरातील एका व्यक्तीची 21 लाख 34 हजार रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे. 
प्राप्त तक्रारीनुसार मारेगाव पोलिसांनी याप्रकरणी चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाने तहसीलमध्ये खळबळ उडाली असून यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा आहे. या प्रकरणी तक्रारदार रमेश म्हसाये (वय 64, रा. छत्रपती नगर नागपूर), यांनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे. आनंदवन चौक वरोरा, देविदास  आंबेकार व राजचिवटे यांची दलाल व मध्यस्थी म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. झरी जामनी तहसील मधील अडीच एकर जमिनीचा सौदा केला. या प्रकरणातील जमिनीची कागदपत्रे मुख्य आरोपी मनोज  दानव रा. वरोरा, प्रवीण ग डाहुले रा. पिसदुरा तहसील वरोरा यांच्या संयुक्त नावे आहेत.
 26 नोव्हेंबर 2019 रोजी जमीन विकण्यात आली. त्याबदल्यात आरोपींनी तक्रारदार रमेश म्हसाय
 यांच्याकडून शेताची किंमत २१ लाख ३४ हजार रुपये घेतली होती. खरेदी पूर्ण झाल्यानंतर हे प्रकरण नोंदणीसाठी महसूल विभागाकडे नेण्यात आले. ही जमीन भूदान यज्ञ मंडळ नागपूरची असून आरोपी मनोज दानव व प्रवीण डाहुले यांचा ती विकण्याचा कोणताही अधिकार नसताना परस्पर विकण्यात आल्याचे तपासात उघड झाले. या प्रकरणात मारेगाव येथे तक्रार दाखल करण्यात आली असून या घटनेचा पोलीस तपास सुरू आहे.
  या प्रकरणात  वरोरा शहरात दलालाचे रॅकेट सक्रिय असून सावधान राहण्याची गरज आहे.
ही जमीन भूदान यज्ञ मंडळ नागपूरची असताना ही जमीन व कागदपत्रे आरोपीच्या नावावर कशी आली? हे काम कोणी केले? आणि दुय्यम निबंधक कार्यालयाने बनावट कागदपत्रांच्या आधारे ही खरेदी कशी केली?
अजून उर्वरित जमीन विकली आहे काय? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. 
त्यामुळे यात मोठे रॅकेट सक्रिय असल्याची चर्चा असून बनावट खरेदी-विक्रीची अनेक प्रकरणे तपासात उघडकीस येण्याची शक्यता आहे.

अधिकार नाहीत
तक्रारदार रमेश म्हसाये  आपली फसवणूक झाल्याचा आरोप फिर्यादीने केला असून आरोपींना पैसे परत करण्यास सांगितले असता आरोपींनी उडवाउडवीची उत्तरे दिली. अखेर रमेश म्हसाये यांनी पोलिसात फिर्याद दिल्यानंतर 21 मार्च 2025 रोजी चारही आरोपींविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.

ही विक्री दुय्यम निबंधक कार्यालयाने कशी करून दिली, दलाल आणि दुय्यम निबंधक यांची साटगाठ असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. विक्रीसाठी आवश्यक कागदपत्रे ,क प्रत मागितलीच नाही का? असे बरेच प्रश्न अनुत्तरीत आहे.

पोलीस  तपासात अनेक बनावट विक्री प्रकरण उघडकीस येण्याची शक्यता आहे.
....

Comments