गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा.

गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर गजानन नगरातील बगिच्याचे लोकार्पण; नागरिकांना मिळाली स्वच्छ व सुरक्षित जागा. वरोरा:22/3/26 शहरातील ओपन स्पेसमध्ये साफसफाई आणि लाइटिंगच्या सुविधांअभावी नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नातून वार्डातील साफसफाईला सुरुवात झाली असून ओपन स्पेस विकसित करण्याचा त्यांचा मानस आहे. याचाच एक भाग म्हणून गजानन नगर येथील ओपन स्पेस मध्ये आमदार व नगरपालिकेच्या सहकार्यातून  सर्वांगीण साफसफाई करून नवीन लाइट सिस्टीम बसविण्यात आली होती.  गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर नगराध्यक्षा अर्चना आशिष ठाकरे यांच्या हस्ते या बगिच्याचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी प्रमुख उपस्थितीत नगरसेवक बंडूभाऊ देऊळकर, अनिलभाऊ झोटिंग, राहुल देवडे, अनिल पाटील सर, गौरकर सर, गोखरे सर, गठ्ठना मामा, धोटे सर, बुरीले सर, चौधरी सर, डॉ. हटवार साहेब, सौ. हटवार, संगीत नवघरे, सौ. नवघरे मॅडम यांच्यासह परिसरातील मान्यवर उपस्थित होते. नवनियुक्त नगरसेवक बंडू देऊळकर यांच्या प्रयत्नांतून वार्डातील साफसफाई व विकासाची कामे सुरू असून ओपन ...

आदिवासी लाभार्थ्यांना मिळणार सोयी सुविधांचा लाभ**Ø धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*

*आदिवासी लाभार्थ्यांना मिळणार सोयी सुविधांचा लाभ*

* धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम योजनेचा जिल्हाधिका-यांकडून आढावा*

चंद्रपूर, दि. 14 : चंद्रपूर व चिमूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पातील लाभार्थ्यांना धरती आबा जनजातीय उन्नत ग्राम योजनेतील सोयीसुविधांचा लाभ मिळणार आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी जिल्हाधिकारी कार्याल्यात नुकतीच बैठक घेतली. यावेळी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपूरचे प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार उपस्थित होते.

पंतप्रधान यांनी 2 ऑक्टोबर 2024 रोजी हजारीबाग, येथे धरती आबा जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानाची सुरूवात केली. सदर अभियानामध्ये राज्यातील आदिवासी जमातीच्या आर्थिक व सामाजिक उन्नतीसाठी 17 शासकिय मंत्रालय / विभाग यांचे मार्फत राबविण्यात  येणा-या विविध योजनांच्या अनुषंगाने 25 उपक्रमाचा समावेश आहे. सदर अभियानामध्ये  चंद्रपुर जिल्हृयातील एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, चंद्रपुर अंतर्गत एकूण 10 तालुक्यांतील 115 आाणि चिमुर प्रकल्पातंर्गत 05 तालुक्यांतील 55 अशा एकूण 167 गावांचा समावेश असणार आहे. सदर योजनेच्या अनुषंगाने सद्यास्थितीचा कामाचा आढावा घेण्याकरीता जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यामध्ये विविध शासकीय यंत्रणेकडून योजनेसंदर्भात माहितीचा आढावा घेण्यात आला. योजनेच्या परिणामकारक अंमलबजावणीकरिता जिल्हा स्तरावर व तालुका स्तरावर  जिल्हास्तरीय समन्वय समिती व तालुकास्तरीय समन्वय समिती  स्थापन करण्यात आलेली आहे.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, ही योजना आदिवासी समाजाकरीता अतिशय उपयुक्त ठरणार आहे. योजनेच्या माध्यमातून आदिवासी समाजाकरीता सोयीसूविधा व शिक्षणाची दर्जेदार संधी उपलब्ध होणार आहे. त्या माध्यमातून प्रगतीशील जीवन जगण्याची एक उत्तम संधी या समाजास प्राप्त होणार आहे. त्यासाठी 17 शासकिय विभागांनी जिल्हयातील 167 गावांचा विकास कार्यक्रमाचा आराखडा तयार करण्याबाबात कार्यवाही करावी, अशा सुचना त्यांनी यंत्रणेला दिल्या.

००००००

Comments