वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीकृष्ण घड्याळपाटील यांचे दुःखद निधन

ज्येष्ठ स्वयंसेवक श्रीकृष्ण घड्याळपाटील यांचे दुःखद निधन 

वरोरा दिनांक 3 फेब्रुवारी 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लहान पासून स्वयंसेवक असलेले श्रीकृष्ण देवराव घड्याळपाटील यांचे वयाच्या 76 व्या वर्षी हृदयविकाराने सोमवार ला पहाटे ५ वाजता दरम्यान दुःखद निधन झाले.
      श्रीकृष्ण घड्याळपाटील यांचा किसान संघाच्या जडणघडणीमध्ये मोलाचा वाटा होता. आणीबाणीच्या काळामध्ये त्यांना १८ महिन्याचा कारावास सुद्धा झालेला होता. १९८६ पासून ते लोकशिक्षण संस्थेचे कार्यवाह म्हणून कार्यरत होते. त्यानंतर २०२२ पासून तर आजतागायत ते संस्थेचे उपाध्यक्ष होते. उत्तम वक्ता, अभ्यासक, लेखक, भाष्यकार म्हणून त्यांचा लौकिक होता. 
    त्यांच्या पश्चात एक कन्या, दोन जावई, नातवंडे असा बराच मोठा आप्त परिवार आहे. त्यांच्यावर वरोरा येथील स्मशानभूमीमध्ये मंगळवार दि ४ फेब्रुवारी ला सकाळी १० वाजता अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
 फोटो.....श्रीकृष्ण घड्याळपाटील

Comments