वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला; आयसीयूत उपचारानंतर कळले खरे कारण.वरोरा पोलिसात तक्रार दाखल.

पत्नीवर लोखंडी रॉडने हल्ला; आयसीयूत उपचारानंतर कळले खरे कारण.

वरोरा पोलिसात तक्रार दाखल.

वरोरा, दि. २५ मार्च – वरोरा येथील जिजामाता वॉर्डात राहणाऱ्या विवाहितेला तिच्या नवऱ्याने लोखंडी रॉडने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पत्नीची प्रकृती बिघडल्याचे सांगून तिच्या पालकांना हॉस्पिटलमध्ये बोलाविण्यात आले होते; मात्र नंतर उघडकीस आले खरे कारन . याप्रकरणी पीडितेच्या आईने वरोरा पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
तक्रारीनुसार, एका युवतीचा  विवाह मे २०२५ मध्ये गणेश  ठेंगणे (वय २५) याच्याशी प्रेमाने झाला होता. लग्नानंतर दोन महिन्यांपासूनच गणेश हा दारूच्या नशेत पत्नीला मारहाण करू लागला होता. त्यावेळी वरोरा पोलिसात तक्रार दिल्यानंतर महिला उपदेशन केंद्रात समजूत घालण्यात आली होती. मात्र, तरीही आरोपीचा त्रास सुरूच राहिला.

दि. १२ मार्च २०२६ रोजी दुपारी एक ते दोनच्या दरम्यान गणेश याने पत्नीच्या वडिलांना फोन करून तिची प्रकृती बिघडल्याचे सांगत एका हॉस्पिटल, चंद्रपूर येथे बोलावले. तेथे गेल्यावर पालकांना मुलगी आयसीयूत बेशुद्ध अवस्थेत आढळली होती. यानंतर हॉस्पिटलच्या स्टाफने सांगितले की, गणेश याने माझी पत्नी पायरीवरून पडल्याचे सांगितले होते. मात्र, दि. २० मार्च रोजी पत्नी शुद्धीवर आल्यानंतर तिने स्वतःच्या आईला सांगितले की, नवऱ्याने लोखंडी रॉडने तिच्या पाठीवर, डोक्यावर व जबड्यावर मारहाण केली होती. आठ दिवसाच्या उपचारादरम्यान सासरच्या कडील कोणीही दवाखान्यात तिला भेटायलाही आले नाही. दि. २२ मार्च रोजी उपचार खर्च वडिलांनी उचलल्यानंतर मुलीला हॉस्पिटल मधून डिस्चार्ज देण्यात आला. सुरक्षिततेच्या कारणास्तव तिला आजोळी ठेवण्यात आले आहे.

या प्रकरणी पीडितेच्या आईने जावई गणेश ठेंगणे याच्याविरुद्ध कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

Comments