खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार: पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला

खाकीची मान उंचावली! पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा भव्य सत्कार  पोलिसांच्या तत्परतेमुळे अनर्थ टळला बातमी: वरोरा 16/4/26 वरोरा : १४ एप्रिल रोजी आंबेडकर जयंतीच्या उत्सवी वातावरणात आंबेडकर चौक, वरोरा येथे अचानक आग लागल्याची घटना घडली. या गंभीर प्रसंगी सहाय्यक  पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांनी विलक्षण तत्परता आणि धाडस दाखवत स्वतः पुढाकार घेत, आपल्या पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहाय्याने आग आटोक्यात आणली. त्यांच्या या वेगवान व धैर्यशील कृतीमुळे मोठा अनर्थ टळला. या पराक्रमाची दखल घेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती, वरोरा तर्फे पोलीस निरीक्षक शरद भस्मे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी त्यांना पुष्पगुच्छ, शाल व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले. शरद भस्मे यांच्या कार्यामुळे ‘खाकी’ वर्दीवरील विश्वास अधिक दृढ झाला असून, त्यांच्या कार्याची सर्वत्र प्रशंसा होत आहे. संकटसमयी दाखवलेली त्यांची जबाबदारी, तत्परता आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी ही इतरांसाठी प्रेरणादायी ठरते. “संकटाच्या वेळी धावून येणारी खाकीच खरी जनतेची ताकद आहे,” याचे उत्तम उदाहरण म्हणजे शरद भस्मे य...

*सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक -जिल्हाधिकारी विनय गौडा*

*सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक -जिल्हाधिकारी विनय गौडा*

चंद्रपूर, दि. 25 : निवडणूक हा लोकशाहीचा पाया असून मतदान करणे हा आपला सर्वोच्च अधिकार व कर्तव्य आहे.  लोकशाही सुदृढ व सक्षम असेल तर देशाच्या विकासाला चालना व गती प्राप्त होते. त्यामुळे देशाचा नागरिक म्हणून प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क प्राथम्याने बजावणे गरजेचे आहे. सुदृढ लोकशाहीसाठी मतदार हा महत्वाचा घटक असल्याचे मत जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी व्यक्त केले.
 
नियोजन भवन येथे 15 व्या “राष्ट्रीय मतदार दिनाच्या” कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपजिल्हाधिकारी (पुनर्वसन) संजय पवार, उपजिल्हाधिकारी अतुल जटाळे, उपविभागीय अधिकारी संजय पवार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शुभम दांडेकर, तहसिलदार विजय पवार, मतदान केंद्रस्तरीय अधिकारी तसेच नवमतदारांची उपस्थिती होती. 

जिल्हाधिकारी श्री. गौडा म्हणाले, देशाच्या लोकशाहीचा केंद्रबिंदू असणाऱ्या मतदारांसाठी “राष्ट्रीय मतदार दिवस” साजरा करण्यात येत आहे. सुदृढ लोकशाहीसाठी प्रत्येक मतदारांनी जागृत राहून मतदान करावे. जबाबदार लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी, लोकशाही आणि देश पुढे नेण्यासाठी प्रत्येक मतदारांचा सहभाग आवश्यक आहे. आता नवमतदारांना वर्षातून चार वेळा ऑनलाईन नाव नोंदणी करता येणार आहे. त्यामुळे मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करुन घ्यावे आणि लोकशाहीतील आपला सर्वात महत्वाचा असा मतदानाचा हक्क बजावावा,असे आवाहन देखील जिल्हाधिकारी श्री.गौडा यांनी केले.
 
 प्रास्ताविकेत बोलतांना उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी म्हणाले, 25 जानेवारी 1950 रोजी भारत निवडणूक आयोगाची स्थापना झाली. सन 2011 पासून संपुर्ण देशभरात राष्ट्रीय मतदार दिन साजरा केला जातो. मतदार विशेषत: युवा मतदारामध्ये मतदानाबाबत जनजागृती करणे, मतदार यादीत नाव नोंदविण्याकरीता प्रोत्साहित करणे, त्यांची नाव नोंदणी करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. मतदार दिवसाची थीम “Nothing like voting, I vote for sure” अशी आहे. लोकशाहीच्या बळकटीसाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा असल्याचे उपजिल्हा निवडणूक अधिकारी श्री. चौधरी म्हणाले. 

तत्पुर्वी, जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थितांना मतदानाची शपथ दिली. कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलनाने करण्यात आली. कार्यक्रमाचे संचालन शिक्षिका सपना पिंपळकर तर आभार नायब तहसीलदार किशोर साळवे यांनी मानले.
  
*उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पर्यवेक्षक व बीएलओंचा सत्कार* :
2024 निवडणुकांमध्ये उत्कृष्ट कार्य करणाऱ्या मतदान केंद्र पर्यवेक्षक व मतदार केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांचा सत्कार जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. व उपस्थित करण्यात आला. 
यामध्ये, पर्यवेक्षक पंचशिला भोयर, मनोज पुलगमकर, नरेश गेडाम, रतिराम चौधरी, नंदकिशोर वर्धलवार, अजय निखाडे तर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी प्रदीप पायघन, प्रकाश राठोड, सुनिता अडबाले,संकेत जयकर, प्रशांत गटलेवार, कृष्णमाला मडावी, रुपेश टिकले, विरेंद्र सुखदेवे, संध्या बोकारे, निरंजन शास्त्रकार, अनिल वाघमारे, ज्योती आसनपल्लीवार आदींचा समावेश होता. 

Comments