वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक

वरोरा : माढा रोडवरील जिनिंगमध्ये भीषण आग; ८ ते १० कोटींचा कापूस जळून खाक दुपारी कापूस टाकताना दुर्घटना; अर्ध्या तासात १० हजार क्विंटल माल राखेत रवीकमल कोटेक्स जिनिंग  येथील घटना  वरोरा .13/4/26: वरोरा तालुक्यापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर असलेल्या मार्डा रोडवरील रवीकमल कोटेक्स कापूस जिनिंग प्रकल्पात सोमवारी दुपारी चार वाजताच्या सुमारास भीषण आग लागली. जिनिंग मधील कापूस डोजरद्वारे टाकत असताना ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. या दुर्घटनेत तब्बल ८ ते १० हजार क्विंटल कापूस जळून खाक झाला असून, सुमारे ८ ते १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. घटनेच्या वेळी परिसरात मोठ्या प्रमाणात कामगार कार्यरत होते. गोदामात कापसाच्या गाठी व बाहेर ट्रक भरून कापसाच्या गाठी लोड करून होत्या. इथपर्यंत अग्निशामक दलाने आग पोहोचू दिली नाही.  आगीने पाहता पाहता रौद्ररूप धारण केले आणि अवघ्या अर्ध्या तासाच्या आतच परिसरातील हजारो क्विंटल कापूस राखरांगोळा झाला. या आगीत कापसासोबतच डोजर ट्रॅक्टर आणि इतर साहित्यही भस्मसात झाले. यानंतर अग्निशमन दलाच्या आठ गाड्या ...

*राजुरा शासकीय आयटीआयची चमु ठरली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल*

*राजुरा शासकीय आयटीआयची चमु ठरली जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत अव्वल*

चंद्रपूर, दि. 24 : जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी कार्यालय चंद्रपूर व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांनी संयुक्तरित्या आयोजित केलेल्या जिल्हास्तरीय क्रीडा स्पर्धेत शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, राजुरा येथील चमुंनी बाजी मारली. आयटीआय च्या प्रशिक्षणार्थ्यांनी बुद्धिबळमध्ये प्रथम व द्वितीय क्रमांक तसेच कबड्डी (मुले) मध्ये प्रथम क्रमांक तर कबड्डी (मुली) मध्ये द्वितीय क्रमांक पटकात विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धेसाठी पात्र ठरत अव्वल क्रमांक पटकाविला.

या स्पर्धेसाठी संस्थेतील सर्व शिल्पनिदेशक व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले. तसेच संस्थेच्या प्राचार्य प्रणाली दहाटे व सर्वसाधारण प्राचार्या पी. बी. डोंगरवार सर्व विजयी प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले तसेच विभागीय स्तरावरील क्रीडा स्पर्धा जिंकण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सदर कार्यक्रमाकरिता गटनिदेशक श्री.रोडे, श्री.मद्देलवा, झामरे मॅडम, श्री. रघोर्ते, श्री. पिंपळकर व इतर सर्वांनी महत्त्वाचे योगदान दिले.

Comments