मुत्री घर गेले चोरीला. नपच्या उदासीन धोरणेमुळे शहरात अतिक्रमानाचा उद्रेक

मुत्री घर गेले चोरीला. 
नपच्या  उदासीन धोरणेमुळे शहरात अतिक्रमानाचा उद्रेक

शहरात महत्त्वाच्या ठिकाणी मुत्रीकडे नसल्याने उघड्यावरच करावी लागते .

वरोरा 
चेतन लूतडे

वरोरा शहरात अतिक्रमानाचा उद्रेक झाला असून प्रत्येक चौकात वळण घेण्यासाठी पुरेशी जागा सुद्धा राहिली नाही. मागील कित्येक वर्षापासून अतिक्रमण हटाव मोहीम नाममात्र झाली असून त्याचा काहीच फरक पडलेला दिसत नाही. 

शहरामध्ये साधी बाथरूमची व्यवस्था सुद्धा करण्यात आली नाही. मात्र जी व्यवस्था होती ती सुद्धा अतिक्रमण धारकांनी गिळंकृत गेली आहे. त्यामुळे शहरातील स्वच्छता सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न प्रत्येक सणासुदीच्या कार्यक्रमाला उभा राहतो. मित्र चौकातील व आंबेडकर चौकातील मुत्रीघर चोरीला गेले असून अजून पर्यंत त्याचा शोध लागलेला नाही अशी तिखट प्रतिक्रिया वरोऱ्यातील प्रत्येक नागरिक व्यक्त करतो. नगरपालिकेने दुर्लक्ष केल्याने या ठिकाणी मोठे अतिक्रमण करण्यात आले असून बऱ्याच ठिकाणी सार्वजनिक शौचालय बाथरूम या जागेवरती दुकाने बांधण्यात आली आहे. रोज कुठे नाही कुठे अतिक्रमण धारक आपला तंबू उभारून अतिक्रमण करीत आहे. नगर प्रशासनाच्या डोळ्यादेखत मोठे मोठे इमारती उभ्या केल्या जात आहे. याकडे दुर्लक्ष केले जात आहे. जनसामान्यांनी तक्रार केल्यास राजकारण केले जात आहे.त्यामुळे जनसामान्य नागरिकांना त्रास होत असून शहरांमध्ये येणाऱ्या नागरिकांना व व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असून वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज आहे. 

स्वच्छतेवर मोठ्या प्रमाणात खर्च करण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात स्वच्छतेच्या नावावर भ्रष्टाचार झाल्याची माहिती मिळताच  राहुल जानवे यांनी PIL दाखल करून स्वच्छतेचा कॉन्ट्रॅक्ट देणाऱ्या कंपनीवर व प्रशासनाच्या अधिकाऱ्यांवर आवाज उचलला आहे. याचे उत्तर अजून पर्यंत मिळाले नसून अधिकारी अडचणीत येण्याची संभावना व्यक्त केली जात आहे.
मागील कित्येक वर्षापासून नगरपालिका निवडणूक झालेली नाही त्यामुळे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्याची खंत वरोऱ्यातील जनतेने व्यक्त केली आहे.